• Sat. Jun 6th, 2026
    Pune Crime : लग्नाच्या वरातीतील भांडण, जुन्या वादातून काटा काढला; पुण्यात भावाने साथीदारांसोबत चुलत भावालाच संपवलं

    Pune Crime News : लग्नाच्या वरातीत नाचण्यावरुन झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी राग मनात धरून भावानेच आपल्या भावाला संपवल्याची मोठी घटना पुण्यात घडली आहे.

    कात्रज चुलत भावाची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : पुण्यातील कात्रज परिसरात काही दिवसांपूर्वी एका घरात लग्नाचा मोठा उत्साह सुरू होता. डीजेचा दणदणाट, नातेवाईकांची गर्दी आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. लग्नाची मिरवणूक रस्त्यावर निघाली आणि सगळे मनसोक्त नाचत होते. पण या आनंदाच्या क्षणातच एक छोटासा वाद पेटला आणि पुढे त्याने भीषण वळण घेतलं.

    रागातून भावालाचा संपवण्याचा कट

    तेजस पिलाने (वय 24) आणि त्याचा चुलत भाऊ विशाल खोपडे हे दोघेही त्या मिरवणुकीत होते. नाचण्यावरून दोघांमध्ये अचानक वाद झाला. त्यावेळी आजूबाजूच्या लोकांनी समजावून प्रकरण शांत केलं आणि मिरवणूक पुढे सरकली. सगळ्यांना वाटलं वाद संपला, पण विशालच्या मनात मात्र तो राग तसाच राहिला. काही दिवस गेले, पण राग कमी झाला नाही. उलट तो सूडात बदलला. विशालने आपल्या काही साथीदारांसोबत मिळून तेजसला संपवण्याचा कट रचला.
    Maharashtra TimesIMD Weather Alert: महाराष्ट्रासह देशभरात उष्णतेची लाट; हवामान विभागाकडून नागरिकांना कडक सूचना, कोणत्या गोष्टी टाळाव्या लागणार?

    रागातून भावानेच भावाला संपवलं

    25 एप्रिलचा दिवस होता. तेजस कात्रज सर्व्हिस रोड परिसरात एकटा होता. हीच संधी आरोपींनी साधली. अचानक त्यांनी त्याला गाठलं आणि कोणतीही चर्चा न करता थेट धारदार शस्त्राने हल्ला केला. काही क्षणांतच तेजस रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि आरोपी फरार झाले. स्थानिक नागरिकांनी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टरांनी प्रयत्न करूनही त्याचा जीव वाचवू शकले नाहीत. काही तासांतच संपूर्ण परिसर हादरला. या घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला. तांत्रिक माहिती आणि गुप्त बातम्यांच्या आधारे चार आरोपींना अटक करण्यात आली. यात विशाल खोपडे, अभिषेक खोपडे, हरिश्चंद्र धुळे आणि आदिनाथ कसबे यांचा समावेश आहे.
    Maharashtra TimesPune Weather: उन्हामुळे जीवाची लाहीलाही! रात्रीच्या उकाड्याने पुणेकर हैराण, पुढील 2 दिवस पावसाचा ‘यलो अलर्ट’
    एक छोटासा वाद…काही दिवसांचा राग…आणि शेवटी एका तरुणाचा जीव गेला. ही घटना पुन्हा एकदा दाखवते की रागावर नियंत्रण सुटलं तर त्याचे परिणाम किती भीषण होऊ शकतात. या प्रकारणानंतर कात्रज परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. भावानेच भावाचा खून केल्यामुळे नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा