Jalna Crime News: ग्राहकांनी बॅंकेत तारण ठेवलेल्या सोन्याची बॅंक अधिकाऱ्यांनीच चोरी केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शाखाधिकाऱ्यासह गोल्ड व्हॅल्यूअरला अटक करण्यात आली आहे.
बँकेच्या सोने तारण कर्जाच्या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी बुधवारी (२२ एप्रिल) बँकेचे सहायक महाव्यवस्थापक बी. व्ही. केशवमूर्ती आले असता, त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. तारण म्हणून ठेवलेल्या २२ कर्ज प्रकरणांतील तीन कोटी ७९ लाख रुपयांचे सोन्याची दागिने व वस्तू बनावट असल्याचे निदर्शनास आले. यासोबत बँकेच्या मुख्य तिजोरीतून सोने तारण ठेवलेल्या मालाची ३० पाकिटे (किंमत तीन कोटी ५२ लाख रुपये) गहाळ झाल्याचे स्पष्ट झाले.
Jalna Crime : वडील बेपत्ता असल्याची तक्रार, लेकीचा धमक्या मिळाल्याचा आरोप; पहाटे बापाचं पार्थिव आढळलं
बँकेच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता बँकेचा अधिकारी संजय डोंगरे यानेच तिजोरीतून सोने तारण कर्जाच्या सोन्याची पाकिटे चोरली असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. त्याच्या या चोरीच्या प्रकारात शाखा व्यवस्थापक विजयेंद्र पाटणकर सहभागी असल्याचे दिसून आले.
Navnath Waghmare यांचं थेट संजय गायकवाडांना ओपन चॅलेंज, ‘मी येतो तुझ्या दारात…’
बँकेच्या सोने तारण कर्जाच्या प्रकरणात सुवर्ण मूल्यमापक (गोल्ड व्हॅल्यूअर) सोनार प्रवीण बुऱ्हाडे याने २२ कर्जप्रकरणांत बनावट सोने खरे असल्याचे प्रमाणित करून दिले असल्याचे या तपासणीत आढळून आले. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे करीत आहेत.
कार-दुचाकीच्या धडकेत दोन ठार
जालना : सिंदखेडराजा रोडवरील गोंदेगाव (ता.जालना) फाट्यावर भरधाव वेगातील कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेमुळे देवमूर्ती गावातील छत्रगुण पंढरीनाथ फुलझाडे (वय २८) आणि यशवंत श्यामराव मिसाळ (वय ३२) हे तरुण जागीच ठार झाले. दुचाकीवरून देवमूर्ती गावाकडे हे दोघेच येत असताना गोंदेगाव फाट्याजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीचा चक्काचूर झाला आणि दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
