• Sat. Jun 13th, 2026

    Nagpur News: रात्रीच्यावेळी घरात शिरला अजगर, कुलरच्या थंड हवेत पलंगाखाली विसावला; थोडक्यात बचावला कुटुंबीयांचा जीव

    Nagpur News: रात्रीच्यावेळी घरात शिरला अजगर, कुलरच्या थंड हवेत पलंगाखाली विसावला; थोडक्यात बचावला कुटुंबीयांचा जीव

    Python Found Inside House In Nagpur: अजगराला पकडताच कुटुंबाचा जीव भांड्यात पडला. साडेचार फुटांच्या या अजगराला वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित अधिवासात सोडण्यात आले.

    घरात शिरला अजगर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, नागपूर: उन्हाच्या वाढत्या तडाख्यापासून वाचण्यासाठी आपण कुलरचा आधार घेतो. याच कुलरच्या गारव्याने अजगरालाही आकर्षित केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कळमेश्वर तालुक्यातील बोरगाव येथील खडसे कुटुंबाच्या घरात थंड कुलरच्या समोर असणाऱ्या पलंगाखाली हा अजगर विसावला होता. वेळीच सर्पमित्राला संपर्क साधल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या अजगराला सुरक्षितरीत्या निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले आहे.

    तीन दिवसांपूर्वी गुरुवारी किरण खडसे या घरी सकाळी झाडू लावत असताना पलंगाच्या खाली काळी शेपूटसदृश वस्तू हलताना दिसली. तिथे अंधार असल्याने त्यांनी दूर जात टॉर्च लावून तपासले असता अजगर गुंडाळी मारलेल्या अवस्थेत आढळला. कुलरच्या समोर असलेल्या पलंगाखाली कुणालाही दिसणार नाही अशा अवस्थेत अजगराने आपला डेरा मांडला होता.

    Maharashtra TimesNagpur News: लग्नाची लगबग सुरु असतानाच तरुण अभियंत्याचा मृत्यू; रात्री झोपला तो सकाळी उठलाच नाही, कुटुंबावर दु:खाचा डोंगर
    अजगराला पाहून घरच्या सगळ्यांची घाबरगुंडी उडाली. त्यांनी तातडीने स्थानिक सर्पमित्र विश्वजित उके यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा सर्पमित्राने तातडीने धाव घेत शर्थीचे प्रयत्न करून अजगराला सुरक्षितरीत्या डब्यात बंद केले.

    Maharashtra TimesSanjay Gaikwad Controversy : ‘तुझाही गोविंद पानसरे करतो!’, संजय गायकवाडांच्या कथित धमकीने खळबळ; वडेट्टीवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांना धाडलं पत्र
    ही काळजी घ्या
    उन्हाळ्यात सरपटणारे प्राणी थंड जागेच्या शोधात असतात. विशेषतः अंगणातील टाके, बाहेरील बाथरूम, कुलर, पाण्याचे माठ किंवा अडगळीच्या जागी त्यांचा वावर वाढतो. अशावेळी घाबरून न जाता किंवा सापाला इजा न करता सर्पमित्रांना बोलवून घ्यावे. घराच्या आजूबाजूला पालापाचोळा जमू देऊ नये, स्वच्छता राखावी, घराच्या दरवाजाला खाली असलेली फट बंद करून घ्यावी, घराच्या परिसरात उंदीर, बेडूक येणार नाहीत, याची काळजी घ्यावी, चप्पल व बूट ठेवण्याचे रॅक व पक्ष्यांचे खोपे जमिनीपासून पाच फूट उंचावर असावेत, असा सल्ला सर्पमित्र विश्वजित उके यांनी दिला.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा