• Sun. Sep 6th, 2026

३६ वी महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धा; अंतिम फेरीसाठी दहा नाटकांची निवड – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Apr 25, 2026
३६ वी महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धा; अंतिम फेरीसाठी दहा नाटकांची निवड – महासंवाद

मुंबई, दि. २५ : सन २०२५-२६ यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या ३६ व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या निकालाची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आली असून या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी दहा नाटकांची निवड करण्यात आली आहे.

या स्पर्धेत एकूण २७ व्यावसायिक नाट्यसंस्थांनी प्रयोग सादर केले होते. त्यातून निवड झालेल्या दहा नाटकांची नावे पुढीलप्रमाणे – सविता दामोदर परांजपे (त्रिकुट व मॅनमेकर्स मीडिया), चिरंजीव परफेक्ट बिघडलाय (जिगिषा क्रिएशन्स), कुटुंब किर्रतन (गौरी थिएटर्स), संगीत बोलविता धनी (कल्पकला एण्टरप्रायझेस), शंकर जयकिशन (भरत जाधव एंटरटेनमेंट), भूमिका (जिगिषा व अष्टविनायक), करुणाष्टके (भद्रकाली प्रॉडक्शन्स), ठरलंय फॉरएव्हर (वाईडविंग्ज मीडिया), मी vs मी (कल्पकला एण्टरप्रायझेस), एकदा पाहवं करुन (अस्मय थिएटर्स).

स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून नारायण जाधव, श्रीनिवास नार्वेकर आणि शिल्पा नवलकर यांनी काम पाहिले. अंतिम फेरीत दाखल झालेल्या सर्व नाट्यनिर्माते, कलाकार व तंत्रज्ञ यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी अभिनंदन केले आहे.

या स्पर्धेची अंतिम फेरी लवकरच मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे.

0000

संजय ओरके/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed