• Sat. Jun 6th, 2026
    Mumbai Local: लोकल ट्रेनचा विलंब आता विसरा! पाचव्या व सहाव्या मार्गिकेमुळे प्रवास सुस्साट; मध्य-पश्चिम रेल्वेवर विस्तार

    Fifth and Sixth Railway Line: गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई उपनगरीय रेल्वेच्या पाचव्या व सहाव्या मार्गिकांचं काम रखडलं होतं. आता पश्चिम रेल्वेवर विरार-बोरिवली दरम्यान तर मध्य रेल्वेवर कुर्ला-परळ दरम्यान विस्तार होणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: मुंबईकरांसाठी लोकल ट्रेन विलंबाने धावणे ही काही नवीन गोष्ट नाही. गेल्या काही दिवसांत तर अशा घटना वाढल्या आहेत. कधी ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे तर कधी लोकलचं रुळावरून घसरल्यामुळे लोकल ट्रेनचा खोळंबा होतो. पण याशिवाय दररोज ट्रेन उशीराने येण्याचं कारण काय? मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास खोळंबण्याने मागचं महत्त्वाचं कारण म्हणजे एक्सप्रेस आणि मेल गाड्या. अनेक वेळा या ट्रेन उशीराने धावत असल्यामुळे उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत होते आणि लोकल प्रवाशांचे हाल होतात.

    2008पासून काम रखडलं

    18 वर्षांपूर्वी या समस्येवर तोडगा काढण्याचं नियोजन करण्यात आलं होतं. यासाठी उपनगरीय रेल्वे गाड्या आणि मेल/एक्सप्रेसचे विभाजन करून दोन्ही रेल्वेसाठी स्वतंत्र रेल्वे मार्ग बांधण्याची योजना तयार केली होती. 2008मधील या योजनेला अखेर चालना मिळत असून दोन्ही पश्चिम आणि मध्य रेल्वेवर दोन नव्या रेल्वे मार्गिका तयार करण्याच्या कामांना वेग मिळाला. यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेवर पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांच्या कामांना अखेर सुरूवात झाली आहे.Maharashtra TimesCentral Railway Megablock: मध्य रेल्वेवर आज 15 तासांचा ब्लॉक! आसनगाव–कसारा दरम्यान लोकल ठप्प; मेल-एक्स्प्रेसवर परिणाम

    दोन्ही मार्गांवरील कामं सुरू असल्यामुळे पश्चिम आणि पूर्व उपनगरातील लोकल प्रवास सुखकर होणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील परेल ते पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रलपर्यंत या मार्गिकांचा विस्तार होणार आहे. यापूर्वी दोन्ही मार्गांवरील उत्तर उपनगरांत विस्ताराच्या कामांना सुरूवात झाली होती. पण काही कारणांमुळे दक्षिणेतील भागाचं काम रखडलं होतं. त्यात जगातील सर्वाधिक गर्दी असलेल्या रेल्वे मार्गावर काम करणं सोपं नव्हतं. जमिनीचे प्रश्न, वाद आणि संरेखन बदल यासारख्या अनेक गुंतागुंतीमुळे हे काम रखडलं होतं.

    कुठे-कसा होणार विस्तार?

    “एप्रिल 2026 पर्यंत, कुर्ला येथील स्वदेशी मिल येथील भूसंपादनाचे अडथळे दूर करण्यात आले आहेत. बांधकामे पाडून कामांना सुरूवात करणे शक्य झाले आहे. प्रकल्पग्रस्तांपैकी 75 टक्के लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे आणि काम सुरळीतपणे सुरू आहे,” असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी सांगितले.

    दरम्यान, पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी देखील बोरिवली ते विरार दरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गिकेचं काम प्रगतीपथावर सुरू असल्याची माहिती दिली आहे. “बोरिवली ते मुंबई सेंट्रल दरम्यान पाचवी मार्गिका तयार करणार असून वांद्रे टर्मिनस ते बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेचं काम अधीच सुरू झालं आहे. पश्चिम रेल्वेने आता खार ते मुंबई सेंट्रल दरम्यान सहावी मार्गिका उभारण्याचं काम हाती घेतलं आहे. 6 व्या मार्गाचे नियोजन केले गेले आहे आणि त्याच्या बांधकामासाठी प्राथमिक नियोजनाचे काम सुरू झाले आहे. एकदा हे काम पूर्ण झाल्यानंतर उपनगरीय आणि एक्स्प्रेस गाड्यांचे विभाजन करण्यास मदत होईल, असे अभिषेक म्हणाले.

    Maharashtra TimesMumbai News: माहीम ते वांद्रे पुलामुळे उत्तर-दक्षिण प्रवास सोपा! मिठी नदी ओलांडून मार्ग; पश्चिम द्रुतगती महामार्गावर कोंडी फुटणार

    कुर्ला ते परळदरम्यान विस्तार

    याशिवाय एमयूटीपी – 2 चा भाग असलेल्या कुर्ला ते परळ पाचव्या व सहाव्या मार्गिकेसाठी भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे 2026पासून या प्रकल्पाचं काम सुरू झालं आहे. हा टप्पा 10 किलोमीटर लांब असेल. या प्रकल्पामध्ये एक नवं उन्नत हार्बर लाइन रेल्वे स्थानक तयार करण्यात येणार आहे. याशिवाय कुर्ला येथे एक नवा स्कायवॉक देखील उभारण्यात येईल.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा