Sanjay Raut on aap split : आम आदमी पार्टीच्या ७ खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या वृत्तावर संजय राऊत यांनी जोरदार प्रहार केला आहे. भाजपची भूक बकासुरासारखी असून हे ‘पेज ३’ नेते ज्या नरकात गेलेत तिथे त्यांना लवकरच वास्तवाची जाणीव होईल, असं राऊत यांनी म्हटलंय.
आम आदमी पार्टीतील फुटीवर संजय राऊतांचा संताप(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: आम आदमी पार्टीमध्येही सध्या भूकंप घडला असून, राज्यसभेतील दोन-तृतीयांश खासदारांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राघव चड्ढा यांच्यासह सात खासदारांनी थेट भाजपचा झेंडा हाती धरल्याने आपला मोठा धक्का बसला आहे. याच मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली असून, भाजपच्या या ऑपरेशन लोटसच्या धोरणाला ‘निर्लज्ज’ आणि ‘बकासुराची भूक’ असं म्हणत टीका केली आहे.
खासदारांवर टीका
भाजपच्या कार्यपद्धतीवर प्रहार करताना संजय राऊत म्हणाले की, “भाजपची राजकारण करण्याची पद्धत आता जगजाहीर आहे. त्यांच्या या राजकारणाचे वर्णन करायचे झाले तर ‘निर्लज्ज’ हा एकच शब्द पुरेसा आहे.” कालपर्यंत जे नेते भाजपला गुंड आणि भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष म्हणून हिणवत होते, तेच आता पक्षात सामील होत आहेत, असे म्हणत राऊत यांनी भाजपमध्ये जाणाऱ्य़ा आपच्या खासदारांच्या दुटप्पी भूमिकेवर निशाणा साधला.
भाजपवर हल्लाबोल
यावेळी राऊत यांनी भाजप ला बकासुर या शब्दात टीका केली. “जशी महाभारत काळातील बकासुराची भूक कधीच शांत होत नव्हती, तशीच अवस्था आज भाजपची झाली आहे. भाजप हा आता बकासुरांचा पक्ष बनला आहे, त्यांना समोर दिसेल ते खाऊन आपले पोट भरायचे आहे,” असा खोचक टोला त्यांनी लगावला.
Marathi Compulsion : रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी येणं गरजेचं, अन्यथा परवाने रद्द? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले…
विरोधी पक्ष कमजोर होणार?
दरम्यान, राघव चड्ढा आणि त्यांच्यासोबत गेलेल्या इतर सात खासदारांमुळे विरोधी पक्षाच्या एकीला तडा जाणार नसल्याचा दावाही राऊत यांनी केला. हे नेते म्हणजे काही मोठे जननेतून निवडून गेलेले नाहीत तर केवळ सोशल मीडियापुरते मर्यादित असणारे ‘पेज ३’ सेलिब्रिटी आहेत, ज्या ‘नरकात’ हे नेते आज आनंदाने गेले आहेत, तिथे गेल्यावर त्यांना वास्तवाची जाणीव लवकरच होईल,” अशा शब्दांत राऊत यांनी आपमधील खासदारांच्या या पक्षांतराचा समाचार घेतला आहे.
दरम्यान, या मोठ्या राजकीय उलथापालथीमुळे आगामी काळात राजधानी दिल्लीमधील राजकारण अधिकच तापणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा