• Sat. Jun 6th, 2026
    Sinner Farmer: सरकारी कामात अडथळा, सिन्नरच्या तहसीलदारासमोरच शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, काय घडलं असं?

    Sinner Farmer News: सिन्नरमधील शेतकऱ्यांनी तहसीलदारांसमोरच स्वतःवर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. काय घडलं असं?

    शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म.टा.वृत्तसेवा, सिन्नर: वडगाव-सिन्नर येथील वहिवाट रस्ता मोकळा करण्याच्या कारवाईदरम्यान गुरुवारी (दि. २३) तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. तहसीलदारांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या कारवाईला विरोध करीत काही जणांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी २८ मार्च २०२५ रोजी वडगाव येथील गट क्रमांक ४२३, ४२४ व ४२५ मधील वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंडळ अधिकाऱ्यांना अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले होते. यासाठी यापूर्वी दोनदा पोलिस बंदोबस्तात कारवाईही करण्यात आली होती. मात्र, निर्णय विरोधात गेल्याने संबंधितांकडून सातत्याने विरोध दर्शविला जात होता. दरम्यान, आदेश होऊनही रस्ता खुला न झाल्याच्या निषेधार्थ ज्ञानेश्वर सांगळे, प्रभाकर कडभाने यांच्यासह काही शेतकऱ्यांनी तीन-चार दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते.

    Maharashtra TimesNashik Crime : अ‍ॅक्सिस नासिक ‘व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप’वर पीडितांचे फोटो शेअर, नाशिक TCS प्रकरणात 75 मिनिटांचा युक्तिवाद, लॅपटॉप स्क्रीनमागे भयंकर
    या पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी १२ वाजता तहसीलदार देशमुख हे महसूल अधिकारी सुमित नेटावणे व पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. कारवाईदरम्यान रामनाथ कचरू सांगळे यांच्यासह इतरांनी रस्त्यावर दगड टाकून अडथळा निर्माण केला. तसेच ड्रममधील डिझेलसदृश ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. सरकारी कामकाजात अडथळा निर्माण झाल्याने संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार गणेश वराडे करत आहेत.

    Maharashtra TimesNashik Leopard Attack: नाशकात बिबट्याच्या हल्ल्यात 2 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू; आई-बापाच्या डोळ्यादेखत उचलून नेलं, परिसरात हळहळ
    दारू विक्रीची माहिती दिल्याच्या संशयातून मारहाण
    सिन्नर : पोलिसांना दारू विक्रीबाबत माहिती दिल्याच्या संशयातून एका तरुणावर सात जणांनी काठ्यांनी हल्ला केल्याची घटना चास येथे घडली. योगेश सुभाष काकड (४१, रा. कासारवाडी) यांना २१ रोजी रात्री संशयितांनी अडवले. ‘तू पोलिसांना मी दारू विक्री करतो अशी माहिती का दिली?,’ असा जाब विचारत चिवडी (पूर्ण नाव अज्ञात), सौरभ अंबादास पवार, अविनाश बाळासाहेब पवार, शरद अंबादास पवार व इतर तिघांनी हल्ला चढवला. त्यानंतर चास ते कासारवाडीदरम्यान रस्त्याने ओढत नेत मारहाण सुरूच ठेवली. या झटापटीत काकड यांच्या गळ्यातील सुमारे २२ ग्रॅम सोन्याची चेन आणि मोबाइल फोन हिसकावून आरोपी पसार झाले. वावी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद सरोवर पुढील तपास करत आहेत.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा