• Sun. Jun 7th, 2026
    Jalgaon-Delhi Flight : प्रवाशांसाठी मोठी बातमी! जळगावाच्या इतिहासात नवा अध्याय, इंदूरसह दिल्ली विमानसेवा; कधीपासून सुरु होणार?

    Jalgaon to Delhi Indore Flight Start : गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांना उत्सुकता लागून असलेल्या जळगावहून इंदूर मार्गे नवी दिल्ली या विमानसेवेला शुभारंभ २ मे या रोजी होणार आहे. प्रवाशांसटी बी आनंदाची बातमी आहे.

    दिल्ली इंदूर जळगाव विमानसेवा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, जळगाव : जळगावकरांसाठी एक आनंदाची बातमी जळगाव विमानतळावरून इंदूरसह दिल्लीला देखील येत्या २ मेपासून विमानसेवा सुरू होणार आहे. ‘अलायन्स एअर’ विमान कंपनीकडून दिल्ली-इंदूर-जळगाव अशी विमानसेवा सुरू होत आहे.

    प्रवास अवघ्या दोन ते तीन तासावर

    जळगाव विमानतळावरून ‘फ्लाय ९१’ या विमान कंपनीकडून गोवा-पुणे, हैदराबाद अशी विमानसेवा सुरू आहे. तर ‘अलायंस एअर’ विमान कंपनीकडून मुंबई, अहमदाबाद अशी विमानसेवा सुरू आहे, आता जळगाव विमानतळावरून दिल्ली- इंदूर- जळगाव एटीआर ७२ ही विमानसेवा सुरू करणार असल्याने जळगाव जिल्ह्याचा हवाई संपर्क थेट सात मोठ्या शहरांशी जोडला जाणार आहे. जळगाव ते दिल्ली रेल्वे मार्गानुसार १,१२३ ते १,१३४ किलोमीटर अंतर असून प्रवाशांना १३ ते १७ तास प्रवास करून दिल्लीला जावे लागत असे. त्यात अति महत्त्वाचे असेल तर छत्रपती संभाजीनगर किंवा मुंबईला जाऊन तेथील विमानतळावरून विमानाने आता दिल्ली गाठावी लागत असे.
    Maharashtra TimesSinner Farmer: सरकारी कामात अडथळा, सिन्नरच्या तहसीलदारासमोरच शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, काय घडलं असं?
    विमानसेवा सुरू झाल्यावर जळगावकरांचा आता दिल्ली प्रवास अवघ्या दोन ते तीन तासावर येणार आहे. ही विमानसेवा सुरुवातीला आठवड्यातून तीन दिवस सुरू केली जाणार असून, यात मंगळवार, गुरुवार व शनिवार अशी राहणार आहे. ‘अलायन्स एअर’ विमान कंपनीकडून गुरूवारी रात्री पासून तिकीट विक्री सुरू करण्याची शक्यता आहे.जळगाव कापूस, केळी आणि धान्य उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. व्यापारीदृष्ट्या जळगाव जिल्ह्याला मोठे महत्त्व आहे. जळगावचा देशाच्या राजधानीशी हवाई संपर्क राहणार असल्याने जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. व्यापार, शिक्षण आणि पर्यटन या क्षेत्रांना याचा थेट फायदा यामुळे होण्याची शक्यता आहे.
    Maharashtra TimesCentral Railway Megablock: मध्य रेल्वेवर आज 15 तासांचा ब्लॉक! आसनगाव–कसारा दरम्यान लोकल ठप्प; मेल-एक्स्प्रेसवर परिणाम

    जळगावाच्या इतिहासात नवा अध्याय

    जळगाव विमानतळाहून आधी जळगाव ते मुंबई आणि मुंबई ते जळगाव ही विमानसेवा सुरू करण्यात आली होती. त्यानंतर जळगाव ते अहमदाबाद ही विमानसेवा सुरू झाली. त्यानंतर जळगाव ते पुणे ही सेवा सूरु करण्यात आली. जळगाव विमानतळाला चांगला प्रतिसाद मिळत असल्यानं आता थेट जळगाव-इंदोर-दिल्ली ही विमानसेवा देखील लवकरच सुरू होणार आहे. जळगाव येथील विमानसेवेच्या इतिहासात आता इंदूर आणि दिल्ली येथील सेवेच्या माध्यमातून नवा अध्याय सुरू होणार असं मानलं जात आहे. त्यामुळे आता प्रवाशांना जळगाव विमानतळावरून इंदूर आणि दिल्लीचाही प्रवास करता येणार आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा