• Tue. Jun 16th, 2026
    Devagiri-Nandigram Express : ऐन उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वे प्रवाशांना फटका; देवगिरी, नंदिग्राम एक्स्प्रेस व्हाया पुणे मार्गे धावणार

    Devagiri-Nandigram Express Via Pune : रेल्वे प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ऐन उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वे प्रवाशांना फटका बसलेला आहे. देवगिरी, नंदिग्राम एक्स्प्रेस व्हाया पुणे मार्गे धावणार आहे.

    देवगिरी नंदिग्राम एक्स्प्रेस व्हाया पुणे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : ऐन उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मुंबईहून मराठवाड्याकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढलेली आहे. याशिवाय मराठवाड्यातूनही मुंबईकडे प्रवासी जात आहे. २५ आणि २६ एप्रिलला खर्डी यार्ड रिमॉडेलिंगचे काम मध्य रेल्वेने हाती घेतले असून या कामामुळे देवगिरी, नंदिग्राम एक्स्प्रेस व्हाया पुणे मार्गे धावणार आहे. तर राज्यराणी एक्स्प्रेसला मनमाडपर्यंत थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून देण्यात आली आहे. मध्य रेल्वेकडून कल्याण-कसारा रेल्वे स्टेशन दरम्यान तिसऱ्या मार्गाच्या कामाशी संबंधित खरडी यार्ड रिमॉडेलिंग कामे करण्यात येणार आहे. या कामांसाठी २५ एप्रिल आणि २६ एप्रिल २०२६ (शनिवार/रविवार) या दोन दिवसांसाठी ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे खालील रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे.

    राज्यराणीला फटका

    २४ एप्रिल २०२६ रोजी सुटणारी रेल्वे क्रमांक १७६११ हजूर साहिब नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राज्यराणी एक्स्प्रेस मनमाडपर्यंतच धावेल. मनमाड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अंशतः रद्द करण्यात आलेली आहे.
    Maharashtra TimesThane Water Cut : पाणीटंचाईची टांगती तलवार! आठवड्यातून एकच दिवस पाणीपुरवठा, नागरिकांना पाणीकपातीचे चटके सोसावे लागणार
    २५ एप्रिल २०२६ रोजी सुटणारी रेल्वे क्रमांक १७६१२ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–हजूर साहिब नांदेड राज्यराणी एक्सप्रेस ही रेल्वे मनमाड येथून प्रारंभ (शॉर्ट ओरिजिनेट) होईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मनमाड दरम्यान अंशतः रद्द केली आहे.

    मार्ग बदल (डायव्हर्जन)

    २५ एप्रिल २०२६ रोजी सुटणारी रेल्वे क्रमांक ११००१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–बल्लारशा नंदीग्राम एक्स्प्रेस ही रेल्वे कल्याण – कर्जत – पुणे – मनमाड मार्गे वळविण्यात येईल.

    २५ एप्रिल २०२६ रोजी सुटणारी रेल्वे क्रमांक १७०५७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -लिंगमपल्ली-देवगिरी एक्स्प्रेस ही गाडी कल्याण – लोणावळा- पुणे – मनमाड मार्गे वळविण्यात येईल.

    Maharashtra TimesPune Bus Accident : पुण्यात भरधाव PMPML बस दुकानात शिरली, चालकाकडून ब्रेक फेल असल्याचं कारण; प्राथमिक तपासात काय माहिती मिळाली?

    Mumbai Metro तिकीट आता रॅपिडोवरही

    मेट्रो प्रवाशांच्या सोयीसाठी तिकीट खरेदीची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या दिशेने ‘एमएमआरडीए’ने आणखी एक पर्याय उपलब्ध करून दिला आहे. आता महा मुंबई मेट्रोचे तिकीट रॅपिडो अ‍ॅपवरही एका टॅपमध्ये घेता येणार आहे. त्यामुळे मेट्रो तिकीट खरेदीसाठी एकूण १६ अ‍ॅपवर सुविधा उपलब्ध झाली आहे. परिणामी स्थानकांवरील तिकीट रांगांमध्ये उभे राहण्याची गरज कमी होणार आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा