Mumbai BJP Morcha: नारीशक्ती विधेयकाविरोधात काँग्रेससह विरोधकांनी केलेल्या मतदानाविरोधात भाजपने मंगळवारी वरळी येथे जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते.
ती महिला वाटेल तसं बोलली, शिव्या दिल्या; वरळीत आंदोलनावेळी नेमकं काय घडलं? गिरीश महाजन स्पष्टच बोलले(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून विरोधी पक्षांच्या निषेधार्थ देशभरात आंदोलन केली जात आहेत. मुंबईतील वरळी येथेही काल भाजपकडून आंदोलन करण्यात आलं होतं. परंतु या आंदोलनावेळी वाहतूक कोंडी झाल्यामुळे एका संतप्त महिलेने भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांची खरडपट्टी काढली. महाजन यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनाही सुनावत सदर महिलेने आपला संताप व्यक्त केला. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता गिरीश महाजन यांनी संपूर्ण घटनेवर आपली भूमिका मांडली आहे.
मुंबईत आंदोलनावेळी झालेल्या घटनेविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता गिरीश महाजन म्हणाले की, “आंदोलन सुरू असताना झालेल्या वाहतूक कोंडीमुळे काही महिला वैतागल्या होत्या. आंदोलनामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी आणि सर्वसामान्यांची गैरसोय होत असते. पण यावेळी एक महिला भगिनी वाटेल त्या भाषेत बोलत होती. महिला पोलिसांविषयीही सदर महिला वाईट भाषेत बोलली. आम्ही १०-१५ मिनिटांत जाऊ, असं मी त्या महिलेला समजावत होतो. पण त्या महिलेने गर्दीत बाटली फेकून मारली, चुकीच्या भाषेचा वापर केला,” असं महाजन यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, असे प्रकार टाळण्यासाठी काळजी घेणार असल्याचंही गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. “पुढच्या वेळी मोर्चामुळे कोणाची गैरसोय होणार नाही, यासाठी आम्ही काळजी घेऊ,” असं महाजन यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री विरोधकांवर बरसले
वरळीतील मोर्चानंतर आयोजित सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. ‘काँग्रेस आणि त्यांच्या चट्ट्याबट्ट्यांनी कायमच महिला आरक्षणाला आणि त्यांच्या सक्षमीकरणाला विरोध केला. आजचा मोर्चा पाहून त्या विरोधकांची झोप उडाल्याशिवाय रहाणार नाही. हा पहिला मोर्चा ही केवळ सुरुवात आहे. जोपर्यंत विरोधकांच्या नाकावर टिच्चून लोकसभेत आणि विधानसभेत ३३ टक्के महिला आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत ही लढाई थांबणार नाही’, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबईत दिला.
‘महिलांना सक्षम करण्याचा काँग्रेसचा कधीच हेतू नव्हता. इतिहासात तसे प्रयत्न झाले तेंव्हा काँग्रेसने विरोधाचीच भूमिका घेतली. २०२३मध्ये भाजपच्या नेतृत्वातील सरकारकडे दोन-तृतीयांश बहुमत होते. विरोध करून फायदा नसल्याने काँग्रेसने तेव्हा मन मारून विधेयकाला पाठिंबा दिला. मात्र, आता भाजपकडे साधे बहुमत आहे, दोन-तृतीयांशचे संख्याबळ नाही. हे माहीत असल्यानेच काँग्रेस व मित्रपक्षांनी आरक्षण लागू करण्यासाठीच्या घटनादुरुस्ती विधेयकाला विरोध केला’, अशी टीका फडणवीस यांनी केली.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा