Pahalgam Attack One Year Complete: रास्ता पेठेतील ‘गनबोटे फरसाण’चे कौस्तुभ गनबोटे यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला. ‘ते गेले, हे अजूनही मन मान्य करायला तयार नाही,’ असे सांगताना संगीता गनबोटे यांचा कंठ दाटून येतो. कुटुंबाची धुरा मुलगा कुणालने सांभाळली आहे.
जगदाळे आणि गनबोटे कुटुंबीयांच्या मनावरील जखमा अजूनही ओल्या आहेत. मात्र दु:खातून सावरून आव्हानांना धैर्याने सामोरे जाण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू ठेवला आहे. भय जागे असले, तरी धैर्याने ते सामोरे जात आहेत.दरम्यान, गेल्या महिनाभरापासून पुण्यातील पर्यटकांचे पुन्हा एकदा चौकशीचे फोन सुरू झाले असल्याची माहिती पर्यटन कंपन्यांनी दिली.
Pahalgam Terror Attack : ‘वादी खुशहाल हैं; बेखौफ होकर आए…’; पहलगामधल्या स्थानिकांची पर्यटकांना आर्त साद, दहशतवादी हल्ल्याची वर्षपूर्ती
आठवणींची साक्ष देणारे क्षण…
कौस्तुभ गनबोटे नेहमीच मुलाला जबाबदारीची जाणीव करून देत असत. ‘मी अचानक गेलो तर’ असा प्रश्न ते हलक्या फुलक्या शब्दांत विचारायचे; पण त्या वाक्यामागे दडलेली जाणीव आज खरी ठरल्याचे कुटुंबीय सांगतात. अक्षय्य तृतीयेच्या दिवशीचा एक प्रसंग कुटुंबासाठी खास ठरला आहे. कौस्तुभ यांना आंब्यांची विशेष आवड होती. त्या दिवशी कुणाल आंबे आणण्यासाठी गेला. मात्र, वडिल आणायचे, त्यांना आवडायचे असे आंबे त्याला मिळाले नाहीत. घरी येऊन त्याने आईला विचारले, ‘बाबा माझी परीक्षा घेत आहेत का?’ हा साधा प्रसंग कुटुंबासाठी भावनिक आठवण बनून राहिला आहे.
Pune News : बाबा माझी परीक्षा घेतायत का? आंबे खरेदीवरुन कौस्तुभ गनबोटेंच्या लेकाचा प्रश्न, आई निरुत्तर; वर्षभरानंतरही दुःखाची छाया
बेखौफ होकर आए…
पुणे : ‘आजही त्या घटनेचा परिणाम जाणवतो. आम्हा स्थानिकांना या घटनेने काय यातना दिल्या, ते शब्दांत सांगणे कठीण आहे,’ अशी भावना जम्मू-काश्मीरमधील स्थानिकांनी व्यक्त केली. पहलगाम या गावी लोक येतात; पण मुक्कामी थांबत नसल्यामुळे इथल्या पर्यटनावर, बाजारपेठेवर त्याचा नकारात्मक परिणाम कायम आहे. मात्र, कडेकोट सुरक्षा असल्याने बिनधास्त यावे, असे आम्ही सांगू शकतो, असे अरमान मीर आणि कंवर टिकू यांनी सांगितले
