• Sun. Jun 14th, 2026
    Pandharpur Rohit Pawar Andolan: तब्येत खालावली, आंदोलनावर ठाम; रोहित पवारांची मंत्र्यांकडून विचारपूस

    Pandharpur Rohit Pawar Andolan: राज्याच्या कोणत्याही कॅबिनेट मंत्र्याने प्रसारमाध्यमांसमोर येऊन कर्जमाफीसाठीच्या जाचक अटी रद्द करण्याचे ठोस आश्वासन देण्याची मागणी या वेळी आमदार पवार यांनी त्यांच्याकडे केली.

    रोहित पवार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, सोलापूर: शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसाठी आमदार रोहित पवार पंढरपुरात अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. शनिवारी आंदोलनाचा दुसरा दिवस असताना आमदार पवार यांची तब्येत खालावली आहे.

    सरकारच्या वतीने उपजिल्हाधिकारी सचिन इथापे, अपर पोलिस अधीक्षक विजय कवाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे, तहसीलदार सचिन लंगोटे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचा आमदार रोहित पवार यांच्याशी फोनवर संपर्क घडवून आणला. या वेळी पुढील दोन-तीन दिवसांत बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले असून, या संदर्भात त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्याचेही सांगितले.

    ‘Ajit Pawar यांच्यासारखा घातपात Eknath Shinde यांच्यासोबतही…’, शिंदेंच्या नेत्याचा खळबळजनक दावा

    ‘कर्जमाफीचा निर्णय घेताना टाकलेल्या या अटी-शर्तींमुळे शेतकऱ्यांमध्ये किती संताप आहे याची जाणीव कदाचित सरकारला झालेली दिसत नाही. परंतु शेतकऱ्यांमध्ये या विषयी प्रचंड रोष असून, या अटी-शर्तींमुळे बहुतांश शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे अटी-शर्ती रद्द केल्याशिवाय किंवा तसे आश्वासन दिल्याशिवाय माघार नाही,’ असे आमदार रोहित पवार यांनी त्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले.

    काँग्रेसचा पाठिंबा
    कर्जमाफीसाठी रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सुरू केलेल्या उपोषणाला काँग्रेसने पाठिंबा दर्शवला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपणही पंढरपूर येथे जाऊन उपोषण करणार असल्याचे शनिवारी जाहीर केले.

    Maharashtra TimesSolapur News : शेअर मार्केटमध्ये तोटा, मुख्याध्यापकाने बायकोसह लेकरांचा जीव घेतला अन् स्वत:ला संपवलं
    आंदोलन निव्वळ राजकीय स्टंटबाजी : गोरे
    रोहित पवार यांना असे आंदोलन करण्याची गरज काय होती? हे निव्वळ राजकीय स्टंटबाजी करण्यासाठी केलेले आंदोलन आहे. मी काय करतोय हे दाखवण्यासाठी त्यांनी हा स्टंट केला आहे,’ असा आरोप सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला. ‘सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे. त्यामुळे शेतकरी सरकारचे आभार मानत आहेत. ३० जूनपूर्वी या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. मात्र, ही कर्जमाफी आमच्यामुळे झाली असे भासवण्यासाठी आंदोलन करण्यात आले आहे. पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांमध्ये वाद निर्माण करून राजकीय पोळी भाजण्यापलीकडे या आंदोलनाचा दुसरा उद्देश नाही,’ अशीही टीका गोरे यांनी केली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा