सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: डोळ्यांत उज्ज्वल भविष्याची स्वप्ने साठवून कॉम्प्युटर सायन्सच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या लातूरच्या एका २१ वर्षीय तरुणीवर काळाने अत्यंत क्रूर घाला घातला आहे. सातारा तांडा रोडवरील आयआरबी पेट्रोल पंपाजवळ शनिवार १३ जून रोजी झालेल्या भीषण अपघातात विद्यार्थिनीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करत, लवकरच मोठी नोकरी लागेल आणि अंथरुणाला खिळलेले बाबा बरे होतील, हा विश्वास उराशी बाळगून लढणाऱ्या प्रतीक्षाचे स्वप्न एका बेजबाबदार हायवा चालकाने कायमचे धुळीस मिळवले आहे. या अपघातानंतर निर्दयी हायवा चालक गाडी थांबवण्याऐवजी पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. प्रतीक्षा बाळासाहेब सांगव असे मयत झालेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, लातूर जिल्ह्यातील चाकूर येथील रहिवासी असलेली प्रतीक्षा छत्रपती संभाजीनगरमधील श्रीयश महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेत होती. सध्या सुट्ट्या सुरू असल्याने ती पुण्यात एका नामांकित कंपनीत इंटर्नशिप करत होती. मात्र, कॉलेजने प्रॅक्टिकल परीक्षा आणि उपस्थिती बंधनकारक असल्याचा मेसेज केल्यामुळे ती तातडीने रात्री पुण्यातून निघाली आणि शनिवारी पहाटेच संभाजीनगरात पोहोचली होती. कॉलेजचे प्रॅक्टिकल संपवून नातेवाकांकडे जात असतानाच साताऱ्यात तिच्यावर काळाने झडप घातली.
स्कुटी घसरली अन् मागून आलेल्या हायवाने चिरडले….
शनिवारी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास प्रतीक्षा तिच्या दोन मैत्रिणींसोबत स्कुटीवरून धुळे-सोलापूर हायवेने सातारा गावाकडे जात होती. पेट्रोल पंपाजवळ रस्ता छोटा असल्याने अचानक त्यांची दुचाकी घसरली आणि तिघीही रस्त्यावर कोसळल्या. त्याच वेळी मागून आलेल्या भरधाव खडीच्या हायवा ट्रकचे जड चाक थेट प्रतीक्षाच्या डोक्यावरून गेले.
“नोकरी लागली की बाबांवर मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार करेन”
प्रतीक्षाच्या निधनाने केवळ एक विद्यार्थिनी गेली नाही, तर एका गरीब कुटुंबाचा आधार हिरावला गेला आहे. ६ वर्षांपूर्वी प्रतीक्षाच्या वडिलांचा मोठा अपघात झाला होता, ज्यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते पूर्णपणे अंथरुणाला खिळले आहेत. वडिलांचे आजारपण आणि लहान भावंडांच्या शिक्षणासाठी तिच्या कष्टकरी आईने धुणे-भांडी करून कुटुंबाचा गाडा चालवला. आयटी क्षेत्रात चांगली नोकरी मिळवून घराचे दारिद्र्य दूर करेन आणि कमावलेल्या पैशातून बाबांवर मोठ्या रुग्णालयात उपचार करून त्यांना पुन्हा पायावर उभे करेन, असे ती नेहमी आपल्या मैत्रिणींना सांगायची. मात्र, साताऱ्यातील मुजोर हायवा चालकांच्या मग्रुरीने एका महत्त्वाकांक्षी मुलीचा आणि संपूर्ण कुटुंबाच्या आशेचा दिवा कायमचा विझवला आहे. या अपघातात प्रतीक्षाचा छिन्नविच्छिन्न मृतदेह पाहून सोबत असलेल्या एका मैत्रिणीला धक्का बसून जागीच भोवळ आली असून, तिच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा