High-Speed Railway Network: देशात लवकरच सात नव्या हाय-स्पीड रेल्वेंचं नेटवर्क तयार करण्याचं काम सुरू होणार आहे. बांधकाम सुरू होताच दरवर्षी 250 किमी लांब मार्गांचं काम पूर्ण करण्याचं रेल्वे मंत्रालयाचं उद्दिष्ट आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: भारतीय रेल्वेने नुकताच एक नवा प्रकल्प हाती घेतला असून यामुळे भारतातील प्रवासाची पद्धतच कायमची बदलणार आहे. कमीत कमी खर्चात वेगवान प्रवास तेही ट्रेनने शक्य होणार आहे. देशात 7 प्रमुख हाय-स्पीड रेल कॉरिडोर बांधण्याची रेल्वे मंत्रालयाची योजना आहे. यासाठी अंदाज 16 लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
वेगवान कनेक्टिव्हिटी मिळणार
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोलकातामध्ये या प्रकल्पांचा आढावा घेतला. तेव्हा त्यांनी दिल्ली-वाराणसी आणि वाराणसी-सिलिगुरी या मार्गाची पाहणी केली. दिल्ली ते सिलिगुरी दरम्यानचा प्रवासाचा वेळ फक्त सहा तासांवर येणार आहे. यावेळी त्यांनी असंही नमूद केलं की मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडोरसह हे नवीन रेल्वे प्रकल्प दक्षिण, उत्तर आणि पूर्व भारतामध्ये हाय-स्पीड रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. या हाय-स्पीड रेल्वेंमुळे अहमदाबाद, मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगळुरू आणि चेन्नई या शहरांमध्ये वेगवान कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम ‘सुपरस्पीड’मध्ये! पहिल्यांदाच बोगद्यांबाहेर बांधणार ‘टनेल हुड’; कसा होणार फायदा?
कसे असतील मार्ग?
पहिली हाय-स्पीड रेल्वे दिल्ली ते वाराणसीपर्यंत धावणार असून हा मार्ग 945 किलोमीटर लांब असेल. प्रवास केवळ 3.5 तासांमध्ये होणार आहे. दुसरी ट्रेन वाराणसी ते सिलिगुरी असून या 670 किमी लांब ट्रेनमुळे प्रवासाचा वेळ 2.4 तासांवर येणार आहे. त्यानंतर मुंबई ते पुणे हाय-स्पीड रेल्वे मार्ग 170 किमी लांब असेल व प्रवास अवघ्या 48 मिनिटांमध्ये होणार आहे. सध्या मुंबई ते पुणेदरम्यान सर्वात वेगवान रेल्वे म्हणजे डक्कन क्वीन. या ट्रेननेही प्रवासात 3.3 तास जातात. चौथा 501 किमी लांब मार्ग पुणे ते हैदराबाद असेल व प्रवास अवघ्या 1.6 तासांत शक्य होणार आहे. त्यानंतर हैदराबाद-बंगळुरू, बंगळुरू-चेन्नई आणि चेन्नई-हैदराबाद मार्गामुळेही प्रवास वेगवान होणार आहे.
पहिली बुलेट ट्रेन कधी?
सध्या भारतात पहिली पूर्णपणे स्वदेशी बनावटीची बुलेट ट्रेन तयार केली जात आहे. ताशी 280 किमी वेगाने ही ट्रेन धावणार असून बुलेट ट्रेनच्या पहिल्या टप्प्यात 100 किलोमीटर मार्गावर धावणार आहे. ऑगस्ट 2027मध्ये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनवरील सुरत ते बिलिमोरा या मार्गाचं उद्घाटन करून ट्रेनसेवा सुरू केलं आहे. या ट्रेनचा वेग नंतर ताशी 350 किमीही करण्याची योजना आहे.
Pune Ring Roadच्या नियोजनाचा खेळखंडोबा! रस्ते विकास महामंडळाकडून ११७ गावं पुन्हा ‘पीएमआरडीए’कडे; आराखडा रखडणार?
सध्या मुंबई आणि अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या बांधकामाचा वेग 15 किलोमीटर दरमहा पर्यंत पोहोचला आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे हे शक्य झालं आहे. दरम्यान, TOIला मिळालेल्या महितीनुसार प्रकल्पाचं बांधकाम सुरू झाल्यावर दरवर्षी 250 किलोमीटर लांब बुलेट ट्रेन मार्ग बांधण्याचं रेल्वे मंत्रालयचं उद्दिष्ट आहे. सध्या मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेन कॉरिडोरची अंतिम डेडलाइन जाहीर केली नसली तरी 2029पर्यंत मार्ग कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा