Pune Fake Police Officer: पुण्यात दिवसेंदिवस गुन्ह्याचे प्रमाण वाढत चालले आहे. आता तर एका 26 वर्षीय तरूणानं कहरच केला आहे. चक्क पोलिसात भरती झाल्याचा बनाव रचून सर्वांची फसवणूक केली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्नेहल निमगिरे, पुणे: पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरूणाने पोलिसात भरती झाल्याचा बनाव रचला होता. पोलीस भरती झाल्याचा आनंद साजरा करत सोसायटीत पेढे वाटले, चौकात मोठा अभिनंदनाचा फ्लेक्स लावला पण नंतर खरे पोलीसच अभिनंदनासाठी घरी पोहोचले, तेव्हा सगळाच बनाव उघड झाला! नर्हे परिसरातील ही धक्कादायक आणि थोडीशी विचित्र घटना सध्या चर्चेत आहे.
नेमकं काय घडलं?
ऋषिकेश राजू जाधव (वय 26, रा. तिडके डेअरी, नर्हे रोड) असे या प्रकरणातील तरुणाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध नर्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. त्याला लहानपणापासून पोलीस होण्याची प्रचंड इच्छा होती. त्यासाठी तो प्रयत्नही करत होता. मात्र, उंचीच्या अटीत तो बसत नसल्याने त्याचे स्वप्न वारंवार हुकत होते. दरम्यान, घरच्यांनी त्याच्या लग्नाचा विचार सुरू केला होता. याच दबावातून त्याने एक धक्कादायक निर्णय घेतला.Pune Crime : पतीशी प्रेमसंबंधाचा संशय, पत्नीने विवाहित सेक्रेटरीचा जीव घेतला, मग बॉडी ऑफिसमध्येच का ठेवली? पोलीस तपासात कारण समोर
ऋषिकेशने आपल्या आईलाच आपण पोलीस भरती झाल्याचे खोटे सांगितले. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर सोसायटीत पेढे वाटून आनंद साजरा केला. त्यानंतर घराबाहेर मोठा फ्लेक्स लावण्यात आला. या फ्लेक्सवर महाराष्ट्र पोलीस दलाचे चिन्ह, पार्श्वभूमीला पोलिसांचे फोटो आणि “ऋषिकेश जाधव यांची पुणे शहर पोलीस पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन” असा मजकूर लिहण्यात आला होता.
कसा झाला पर्दाफाश?
इतकंच नव्हे, तर त्याने पोलीस वर्दी घालून फोटो काढले आणि ते व्हॉट्सअॅप स्टेटसवरही ठेवले. परिसरात ही बातमी पसरताच, “आपल्या हद्दीतला मुलगा पोलीस झाला” म्हणून नर्हे पोलीस ठाण्याचे अधिकारी त्याचे अभिनंदन करण्यासाठी थेट घरी गेले. मात्र, चौकशीदरम्यान सत्य समोर आले आणि सगळाच प्रकार उघडकीस आला.
Pune Water Cut: पुणेकरांनो, पाणी भरुन ठेवा! शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बंद; कोणत्या भागांना फटका? वाचा लिस्ट
सार्वजनिक सेवक नसताना स्वतःला पोलीस असल्याचे भासवणे, खोटा फ्लेक्स लावणे आणि लोकांची दिशाभूल केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस फौजदार शिंदे करत आहेत. या आश्यर्य कराव्या वाटणाऱ्या आणि तितक्याच मजेशीर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. “पुणे तिथे काय उणे” म्हणले जाते, पण ते तितक्याच मजेशीर आणि आश्चर्याच्या वारंवार घटनानी दाखवून देखील दिले जाते. आता पुण्यात फक्त टोमण्याच्या पाट्या नाही तर फ्लेक्सचीही चर्चा सर्वत्र रंगली आहे
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा