Nagpur News: घटनेच्या आदल्या दिवशी देखील महिला आणि तिच्या साथीदारामध्ये तीव्र वाद झाला होता आणि त्यावेळी आरोपीने मारहाण केल्याचा आरोप आहे.
पतीसोबत घटस्फोट, प्रियकरासह लिव्ह इनमध्ये राहायला लागली, पण 7 वर्षांत सगळं संपलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : नागपूर शहरातील बजाजनगर परिसरात घडलेल्या 51 वर्षीय महिलेच्या आत्महत्येच्या प्रकरणाला तपासादरम्यान नवे वळण मिळाले आहे. सुरुवातीला आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झालेल्या या घटनेत आता लिव्ह-इन साथीदाराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नातेवाईकांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे पोलिसांनी तपासाची दिशा बदलत अधिक सखोल चौकशी सुरू केली आहे. रेश्मा शशिकांत रेवतकर असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेचा 2019 मध्ये पतीशी घटस्फोट झाला होता. त्यानंतर ती शशांक गजभिये या व्यक्ती सोबत राहत होती. काही काळ सर्व काही सुरळीत असले तरी पुढे दोघांमध्ये वारंवार वाद होऊ लागल्याची माहिती समोर आली आहे. या वादांचे कारण संशय आणि परस्पर अविश्वास असल्याचे सांगितले जात आहे. मृत महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करताना आरोप केला की, आरोपी सातत्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तसेच तो तिच्यावर मानसिक दडपण आणत असे आणि वेळोवेळी शारीरिक अत्याचारही करत होता. गेल्या काही महिन्यांत हा त्रास अधिक वाढल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे.
10 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास महिला आपल्या राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारल्याची माहिती समोर आली. घटनेनंतर तिला तातडीने नागपुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.
प्रारंभी पोलिसांनी ‘अॅक्सिडेंटल डेथ’ (एडी) म्हणून नोंद करत तपास सुरू केला होता. मात्र, नातेवाईकांच्या तक्रारीनंतर आणि प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या बाबींमुळे पोलिसांनी प्रकरणाचा पुनर्विचार केला. त्यानंतर भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमानुसार आरोपीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू असून, घटनेच्या पार्श्वभूमीवर साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात आहेत. तसेच मोबाईल कॉल रेकॉर्ड, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा