Marathwada Farmer Death Cases: मराठवाड्यात वर्षभरात सुमारे हजार शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं. कोणत्या जिल्ह्यांत सर्वाधिक घटना?
मराठवाड्यात सर्वदूर सिंचनाची सोय नाही. निसर्गाच्या लहरीपणाचा सामना येथील शेतकऱ्यांना नेहमीच करावा लागतो. पाणीटंचाई, दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागणाऱ्या या विभागात गेल्या चार ते पाच वर्षांत मान्सूनमध्ये अतिवृष्टी, सततचा पावसाचादेखील तडखा बसला आहे. गेले वर्षदेखील त्यास अपवाद नव्हते. पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. ऐन रब्बी हंगामात अवकाळी पावसासह गारपिटीचे संकटदेखील शेतकऱ्यांवर कोसळले आहे. एकूणच कधी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान, तर कधी मालाला भाव नाही. परिणामी, बिघडलेली आर्थिक गणिते अशा या चक्रात अन्नदाता सापडला आहे. या व इतर कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर येत आहे.
Chhatrapati Sambhajinagar News : डॉक्टर माझ्या गणेशला वाचवा हो! नळाला मोटर लावताना शॉक लागला, छ. संभाजीनगरात अक्षय्य तृतीयेला 11 वर्षीय चिमुरडा दगावला, वडिलांचा सुन्न करणारा आक्रोश
विभागीय आयुक्तालयाच्या अहवालानुसार, जानेवारी महिन्यात ७६, फेब्रुवारीत महिन्यात ५९, मार्च महिन्यात ८२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात सर्वाधिक ५३ घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घडल्या असून, त्या खालोखाल बीड जिल्ह्यात ४९ दुर्दैवी घटना घडल्या, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, आत्महत्येच्या या २१७ प्रकरणांपैकी ४७ प्रकरणे सरकारी मदतीसाठी पात्र ठरवण्यात आली आहेत. १६१ प्रकरणे चौकशी वा निर्णयसाठी प्रलंबित असून, ४७ प्रकरण अपात्र ठरली आहेत.
Maharashtra Politics : छत्रपती संभाजीनगरमध्ये 10 जणांना नगरसेवकपदाची लॉटरी, कुणाकुणाला मिळाली संधी?
शेतकरी आत्महत्यांची जिल्हानिहाय माहिती (एक ते ३१ मार्च २०२६)
जिल्हा -आत्महत्या
छत्रपती संभाजीनगर — ५३
जालना — १३
परभणी — १९
हिंगोली — १३
नांदेड — २९
बीड — ४९
लातूर — ११
धाराशिव — ३०
एकूण — २१७
