Vande Bharat News Timetable: 2023मध्ये सुरू झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हजूर साहिब नांदे वंदे भारत एक्सप्रेचे वेळापत्रक 3 मेपासून बदलणार आहे. या सुधारित वेळापत्रकामुळे प्रवासात वेळ वाचणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: मुंबई ते हजूर साहिब नांदेड धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकात मोठा बदल झाला असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे. त्यामुळे या बदलांची दखल घेऊन प्रवाशांनी नियोजन करण्याचे आवाहन यावेळी देण्यात आहे. आहे. मध्य रेल्वेवर धावणाऱ्या या वंदे भारतला प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळतो. त्यामुळे या बदललेल्या वेळांचा मोठा परिणाम यांच्यावर होणार आहे.
सर्वात वेगवान ट्रेन
मुंबई ते हजूर साहिब नांदेडपर्यंत वंदे भारत हाय स्पीड ट्रेनची सुरुवात 30 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आली. या मार्गावरील इतर गाड्यांना प्रवासासाठी 11 तासांचा कालावधी लागतो. पण वंदे भारतमुळे मुंबई ते नांदेड प्रवास अवघ्या 9 तास 40 मिनिटांत पूर्ण होतो. त्यामुळे ही या मार्गावरील सर्वात वेगवान ट्रेन आहे. मनमाड जंक्शनमार्गे धावणाऱ्या या ट्रेनला मोठा प्रतिसाद मिळतो. रेल्वेकडून या वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळेत सुधारणा करण्यात आली आहे.Pune News: पुणेकरांना दिलासा मिळणार! शहरातून आणखी एका ‘अमृत भारत एक्सप्रेस’ला हिरवा कंदील; हडपसर ते वाराणसी ट्रेन
सुधारित वेळापत्रक पाहा
ट्रेन क्रमांक 20706 मुंबई-हजूर साहिब वंदे भारत एक्सप्रेस सीएसएमटी येथून 13.10 ऐवजी 13.15 वाजता रवाना होईल. तसेच, नांदेड येथे ही ट्रेन 22.50 ऐवजी 22.25 वाजता पोहोचणार आहे. त्यामुळे या प्रवासात प्रवाशांचा अर्धा तास वेळ वाचणार असल्यामुळे प्रवास अधिक वेगवान होणार आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान, परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक 20705 हजूर साहिब नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस 5 ऐवजी 5.20 ला रवाना होईल. तसेच, सीएसएमटी स्थानकावर 14.25 ऐवजी 14.15 वाजता पोहचणार आहे. या प्रवासातही अर्धा तास वेळ वाचणार आहे.
हे बदललेले वेळापत्रक 3 मे 2026पासून लागू होणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हजूर साहिब नांदेड दरम्यान ट्रेन आठ स्थानकांवर थांबते. यामध्ये दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड जंक्शन, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जंक्शन या स्थानकांचा समावेश आहे.
Navi Mumbai News: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली! चार प्रवासी अडकल्याने खळबळ; सकाळच्या गर्दीत प्रवाशांचा खोळंबा
या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये वातानुकूलित चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कार अशा दोन प्रकारच्या डब्यांचा समावेश आहे. सीएसएमटी मुंबई ते हजूर साहिब नांदेड दरम्यानच्या एसी चेअर कारचे तिकीट 1,790 रुपये आहे, तर एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे तिकीट 3,135 रुपये आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा