Amravati Girls Assault Case : मुख्य आरोपी अयान अहमद याची सोशल मीडियावरील ‘क्रेझ’ काही कमी झालेली नाही. गुन्हा दाखल झाला तेव्हा त्याचे इन्स्टाग्रामवर १८ हजार फॉलोअर्स होते, ज्यात आता भर पडताना दिसत आहे
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, अमरावती : परतवाडा येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार आणि आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याच्या प्रकरणाचा तपास आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. विशेष तपास पथकाने तांत्रिक पुराव्यांच्या जोरावर या प्रकरणात मोठे यश मिळविले आहे. जप्त करण्यात आलेल्या पाचपैकी तीन मोबाइलमधील डेटा रिकव्हर करण्यात तांत्रिक विभागाला यश आले आहे. या नव्या पुराव्यांमुळे प्रकरणातील संशयितांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ब्लॅकमेलिंगच्या दिशेने तपास केंद्रित
एसआयटीने आतापर्यंत दहा संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. तपासाची चक्रे फिरवताना, मुख्य आरोपी अयान अहमद आणि त्याचा मित्र उजैर खान यांनी पीडित मुलींच्या कुटुंबीयांना ब्लॅकमेल करून पैशांची मागणी केली होती का, या दिशेने तपास केंद्रित करण्यात आला आहे. Pune Crime : आत्याकडे लहानाची मोठी, तिच्याच मुलाशी लग्न; पुण्यात 21 वर्षीय विवाहितेने जीव दिला, कदम मायलेकावर गुन्हा
‘मुस्लिम समाजाने शिक्षेला पाठिंबा द्यावा’
दरम्यान, परतवाडा येथील लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याच्या कृत्याचा परतवाडा येथील शहर-ए-काजी सय्यद गैसोद्दीन यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. आरोपी कोणत्या धर्माचा आहे, हे पाहून त्याची तरफदारी करणे चुकीचे आहे. उलट, अशा प्रकरणात मुस्लिम समाजाने अधिक जोमाने आरोपीला शिक्षेसाठी पाठिंबा द्यावा, अशी स्पष्ट आणि आक्रमक भूमिका त्यांनी मांडली.
Air India Crash : पत्नी-लेकीचा एअर इंडिया अपघातात मृत्यू, दहा महिन्यांनी यूके सरकारचा ईमेल, 28 वर्षीय तरुणावर आभाळ कोसळलं
इन्स्टा फॉलोअर्सची संख्या वाढतीच
मुख्य आरोपी अयान अहमद याची सोशल मीडियावरील ‘क्रेझ’ कमी झालेली नाही. गुन्हा दाखल झाला तेव्हा त्याचे १८ हजार फॉलोअर्स होते, ज्यात आता चार हजारांची भर पडून ही संख्या २२ हजारांच्या पार गेली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी आणि एसआयटीचे प्रमुख शुभम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक अत्यंत वेगाने तपास करत आहे. मोबाइलमधील डेटा आणि चॅट्समधून अनेक खळबळजनक बाबी समोर येण्याची शक्यता असून, लवकरच काही मोठ्या अटकेची शक्यताही सूत्रांनी वर्तविली आहे. सध्या संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष एसआयटीच्या पुढील कारवाईकडे लागले आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा