• Sun. Jun 7th, 2026
    Local Accident Dombivli : डोंबिवलीमध्ये लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे हाल

    डोंबिवली स्थानकात रिकाम्या लोकलचा डबा रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांचे हाल झाले असून कल्याण ते सीएसएमटी एसी लोकलवरही टांगती तलवार आहे.

    डोंबिवली स्थानकात लोकलचा डबा रुळावरून घसरला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    ठाणे: मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी लोकल सेवा आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज सोमवारी विस्कळीत झाली आहे. डोंबिवली स्थानकात लोकलचा एक डबा रुळावरून घसरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याचा मोठा फटका मध्य रेल्वेच्या वाहतुकीला बसला आहे. विशेषतः कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या धिम्या मार्गावरील वाहतूक सध्या ठप्प झाली असून, कामावर निघण्यासाठी घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत.

    कालही फलाट बंद होते

    कोपर आणि ठाकुर्ली स्थानकातील धीम्या मार्गावरील वाहतूक रविवारी फलाट रुंदीकरणासाठी बंद ठेवण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले असताना आठवड्याचा पहिलाच दिवस रेल्वे प्रवाशासाठी डोकेदुखीचा ठरला. सकाळी ८.३० वाजताची कल्याणच्या दिशेने जाणारी लोकल डोंबिवली स्थानकातून मार्गस्थ होत असतानाच घसरली. यामुळे डोंबिवली पुढील प्रवासाचा खोळंबा झाला. या लोकलच्या मागे असलेल्या डोंबिवली ते दिवा दरम्यानच्या चार लोकल डोंबिवली स्थानकातून पुन्हा मुंबईच्या दिशेने वळवण्यात आल्या असून मागील तासभरापासून लोकल सेवा ठप्प आहे.

    कोपर, ठाकुर्लीला एकही ट्रेन थांबणार नाही

    मुंबईकडून कल्याणच्या दिशेने जाणारी सकाळी ८.३० वाजताची लोकलचे दोन डबे डोंबिवली स्थानकात घसरले. यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून कल्याण कडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आणि येणाऱ्या लोकलचे वेळापत्रक कोलमडले आहे. दरम्यान कोपर आणि ठाकुर्ली दरम्यान पुढील काही काळ एकही लोकल थांबणार नसून प्रवाशांनी डोंबिवली स्थानकातून जलद लोकलने प्रवास करावा, कल्याण ते दिवा दरम्यान सर्व लोकल जलद मार्गावरून चालवल्या जात असल्याची उद्घोषणा रेल्वे प्रशासनाकडून केली जात आहे.

    Maharashtra TimesSunetra Pawar: बारामतीत प्रचाराच्या सांगता सभेचा ‘गेम’ बदलला; सुनेत्रा पवारांनी स्मार्ट निर्णय घेत दिला महत्त्वाचा संदेश

    एसी लोकलवरही टांगती तलवार

    या अपघातामुळे केवळ कल्याणकडे जाणारी वाहतूकच नाही, तर सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या धिम्या गाड्यांवरही लवकरच परिणाम होण्याची शक्यता आहे. जर ही समस्या वेळेत सुटली नाही, तर सकाळी १०:२५ ची कल्याण ते सीएसएमटी ही एसी लोकल रद्द किंवा प्रभावित होऊ शकते. सध्या जलद मार्गावरील गाड्यांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली आहे.

    प्रशासनाचे आवाहन

    रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. “परिस्थिती पूर्ववत होण्यास काही वेळ लागण्याची शक्यता असल्याने प्रवाशांनी खबरदारी घ्यावी आणि शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा अवलंब करावा,” अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या बिघाडामुळे दिवसभर लोकलचे वेळापत्रक कोलमडलेले राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेचे अपडेट्स तपासूनच प्रवासाचे नियोजन करा.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा