• Sun. Jun 7th, 2026
    Jalgaon Crime : काम आवरुन खोलीत झोपला, आईने उठवण्यासाठी दरवाजा ठोठावला; खिडकीतून बघताच माऊलीच्या पायाखालची जमीन सरकली

    Jalgaon Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच जळगावमध्ये एक मोठी घटना समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    भडगाव तरुणाची रुममध्ये आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    निलेश पाटील, जळगाव : जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील खुशाल आप्पा नगर भागातील २३ वर्षीय तरुणाने राहत्या घरात स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल शनिवारी रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. नेमकी या तरुणाने आत्महत्या का केली? याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

    नेमकी घटना काय?

    भडगाव शहरातील खुशाल आप्पा नगर भागात राहणारा स्वप्निल प्रवीण शिंपी (वय २३) या तरुणाने काल शनिवारी साडेचार वाजेच्या सुमारास त्याच्या रूममध्ये झोपण्यासाठी गेला होता. भरपूर वेळ झाल्यानं स्वप्निलची आई त्याला उठण्यासाठी गेली असता त्याने कुठलाही प्रतिसाद दिला नाही. शेवटी स्वप्निलच्या आईने त्याला कॉल केला, मात्र कॉलला देखील त्याने प्रतिसाद न दिल्यानं खिडकीतून डोकावून बघितलं असता स्वप्निल हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला.स्वप्नील हा दुपारी आपल्या घरातील खोलीचा दरवाजा आतून बंद करून झोपला होता. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास त्याच्या आईने त्याला उठवण्यासाठी दरवाजा ठोठावला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर मोबाईलवर कॉल करूनही स्वप्नीलने फोन न उचलल्याने आईला संशय आला. अखेर खिडकीतून डोकावून पाहिलं असता, स्वप्नील रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. स्वप्निलच्या आईने आरडाओरड करून आजूबाजूच्या रहिवाशांना कल्पना दिली त्यानंतर दरवाजा तोडून स्वप्निलला बाहेर काढण्यात आलं.

    घटनेत स्वप्नीलचा मृत्यू

    रुममधून बाहेर काढल्यानंतर शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आलं. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांना कळवलं आणि पुढील उपचारासाठी जळगाव येथे घेऊन जाण्यास सांगितलं. मात्र, दुर्दैवाने या घटनेत स्वप्नीलचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन चाळीसगाव विभागाचे डीवायएसपी यांनीही घटनास्थळाला भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. तपासात अचूकता यावी यासाठी फॉरेन्सिक टीमला देखील पाचारण करण्यात आलं होतं. तपासाकामी खासगी कट्टा, मयताचा मोबाईल, रक्ताचे नमून्यांसह अन्य गोष्टी ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

    स्वप्निलला तो शेवटचा कॉल कुणाचा

    स्वप्निलला एक कॉल आला होता. त्या कॉलनंतर तो एकदम अस्वस्थ वाटू लागला होता, आणि त्याच्या चेहऱ्यावर भीती निर्माण झाली होती. त्यामुळे तो कॉल ठेवल्यानंतर तो त्याच्या रूममध्ये झोपायला गेला आणि आतून कडी लावली. त्यानंतर डोक्यात त्याने गोळी झाडली. मात्र, नेमका तो कॉल कोणाचा होता? आणि कशासाठी होता? हे अद्याप समोर येऊ शकलेलं नाही. मात्र, पोलीस तो शेवटचा कॉल कुणाचा होता, याचा तपास करत आहेत.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा