• Tue. Sep 22nd, 2026

Miraj Civil Hospital : पोलीस जेव्हा देव बनतात, मिरज सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर संकट कोसळलं, नेमकं काय घडलं?

सांगली जिल्ह्याचील मिरज येथे मिरज शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या कमानीचे बांधकाम सुरु असतानाच मजुरांवर स्लॅब कोसळल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनेनंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी मजुरांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सांगली : मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या (सिविल हॉस्पिटल प्रवेशद्वारावरील कमानीचे काम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत काम करणारे सात मजूर सिमेंट, काँक्रीट आणि लोखंडी सळ्यांच्या ढिगाऱ्याखाली गाडले जाऊन जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक अमित कुमार पाटील, मिरज गांधी चौकीचे पोलीस सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांनी स्वतः बचावकार्यात उतरून जखमी मजुरांना सुखरूप बाहेर काढले.

नेमकं काय घडलं?

​मिरज शासकीय रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर नवीन कमानीच्या स्लॅबचे बांधकाम सुरू होते. मजूर या कमानीवर काम करत असतानाच अचानक संपूर्ण स्लॅब कोसळला. त्यामुळे तिथे कार्यरत असलेले सात मजूर थेट सिमेंट-काँक्रीट आणि लोखंडी साहित्याच्या ढिगाऱ्याखाली दाबले गेले. अचानक झालेल्या या घटनेमुळे रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली.

Maharashtra TimesPandharpur News : उतारवयात प्रेम जडलं, वृद्धेने वादातून प्रियकराला संपवलं, दीड महिन्यांनी घटनेचा उलगडा

पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले

​घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलीस ठाणे, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे आणि महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचा प्रचंड पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी तात्काळ जेसीबी पाचारण करण्यात आले.

sangli news

सात मजुरांवर उपचार सुरु

पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी जेसीबीच्या साहाय्याने ढिगारा बाजूला करत सर्व मजुरांना सुखरूप बाहेर काढले. ​ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलेल्या सर्व सात मजुरांना तात्काळ मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींपैकी सहा मजुरांची प्रकृती स्थिर असून एका मजुराला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर विशेष वैद्यकीय पथकाद्वारे उपचार सुरू आहेत.

Maharashtra TimesSatara News : आमदाराची गाडी असल्याचा बनाव, गाडीवर VIP स्टीकर, पोलिसांनी खाक्या दाखवला अन् सत्याचा उलगडा

जिल्हा पोलीस अधीक्षकांची प्रतिक्रिया

​”रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरील कमानीचे काम सुरू असताना हा अपघात घडला. पोलीस आणि मदत यंत्रणेने वेळेवर बचाव कार्य राबवून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुरांना बाहेर काढले आहे. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत”, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली आहे.

Maharashtra TimesNashik Politics : एकनाथ शिंदेंची शिवसेना तालुकाप्रमुखांना देणार 14 बुलेरो गाड्या, पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

आमदारांचे निकृष्ट बांधकामाचे आरोप

या ठिकाणी निकृष्ट दर्जाचे बांधकाम सुरू असल्याने याची तक्रार वैद्य शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे करणार असल्याची माहिती आमदार इद्रिस नायकवडी यांनी दिली आहे. ​या अपघातानंतर बांधकाम दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. प्रशासनाकडून या घटनेची दखल घेतली जाते का? ते पाहणं आता महत्त्वाचं आहे.