Latur Crime News : एकाच कुटुंबातील दोन मुले बेपत्ता झाली, त्यानंतर एका मुलाचा मृतदेह सापडल्याने लातूरमध्ये एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे. या प्रकरणी स्वतंत्र तपास पथकं तयार करण्यात आली आहेत.
चाकूर स्वामी कुटुंब दोन मुलं बेपत्ता(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ऋषिकेश होळीकर, लातूर : आज सकाळी लातूरमधील चाकूर शहरातील स्वामी परिवारातील दोन सख्खे चुलत भाऊ घराबाहेर खेळण्यासाठी गेले परंतू ते परत न आल्यानं घरच्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र, ते परतलेच नाही यामुळे कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. स्वामी कुटुंबातील दोन चुलत भाऊ आज सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास घरातून बेपत्ता झाले. यापैकी एकाचे वय ६ वर्ष तर दुसऱ्याचं वय ११ वर्ष आहे.
खेळायला गेलेली मुले परतलीच नाहीय
सकाळपासून दोन्ही मुलांचा सर्वत्र शोध घेण्यात येत होता. कुटुंबीयांनी तातडीने चाकूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गावात आणि परिसरात शोधमोहीम सुरू असतानाच काही तासांनी धक्कादायक घटना उघडकीस आली. ६ वर्षीय देवांश मंगेश स्वामी हा घरापासून अवघ्या सुमारे ६० फुटांवर मृताअवस्थेत आढळून आला. ही माहिती मिळताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली. Pune Crime : ‘तुझा नवरा बाहेर गेलाय, आपण मज्जा करू’; पुण्यात रिक्षाचालकाकडून घरात घुसून महिलेसोबत जबरदस्ती, धमकीही दिली
दिनेश स्वामी अद्याप बेपत्ता
११ वर्षीय साईचरण दिनेश स्वामी हा मुलगा अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. ही मुलं नेमकी कशामुळे बेपत्ता झाली, ६ वर्षीय मुलाचा मृत्यू अपघाती आहे की घातपात? तसेच दुसरा मुलगा नेमका कुठे आहे? या सर्व बाबींविषयी अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. पोलीस तपासानंतरच या घटनेमागील नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. पार्थिव चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. घटनेची माहिती पसरताच नातेवाईक आणि गावकऱ्यांनी रुग्णालयासमोर मोठी गर्दी केली होती. Yavatmal Crime : यवतमाळमध्ये डोकं चक्रावणारं प्रकरण, कथित ऑडिओ क्लिप व्हायरल, मुली बेपत्ता कशा झाल्या? वाचा A टू Z
पोलिसांनी काय माहिती दिली?
घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन लातूर जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह फॉरेन्सिक टीम, फिंगरप्रिंट टीम, डॉग स्क्वॉड आणि स्थानिक गुन्हे शाखेची (एलसीबी) पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. बेपत्ता असलेल्या दुसऱ्या मुलाचा शोध घेण्यासाठी तसेच लहान मुलाच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. याबाबत माहिती देताना पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितलं की, ‘घटनेचं गांभीर्य लक्षात घेताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेसह लातूर आणि अहमदपूर येथील पोलिसांची पथके चाकूर येथे दाखल झाली आहेत. जवळपास १० पथके तयार करण्यात आली असून आरोपीचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. त्याचबरोबर बेपत्ता असलेल्या मुलाबाबत माहिती गोळा करून त्याचा शोध घेण्यावर विशेष भर दिला जात आहे.’
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा