• Sun. Jun 14th, 2026
    Jalna Crime : वडील बेपत्ता असल्याची तक्रार, लेकीचा धमक्या मिळाल्याचा आरोप; पहाटे बापाचं पार्थिव आढळलं

    Jalna Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच जालनामध्ये एक मोठी घटना दरेगाव शिवारात एका पुरुषाचं पार्थिव आढळून आलं आहे.

    दरेगाव कैलास पवार मृतदेह(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    योगेश काकफळे, जालना : जालना तालुक्यातील दरेगाव शिवारात आज रविवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास एका व्यक्तीचं संशयास्पद पार्थिव आढळून आल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीची ओळख कैलास दत्तू पवार (वय ४५, रा. इंदेवाडी, पाण्याच्या टाकीजवळ) अशी पटली असून, हा प्रकार हत्येचा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त करत मुख्य आरोपींच्या अटकेशिवाय पार्थिव स्वीकारण्यास नकार दिला आहे. तसेच या प्रकरणाची सीआयडीमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

    नेमकी घटना काय?

    मिळालेल्या माहितीनुसार, कैलास पवार हे १७ एप्रिल शुक्रवारपासून घराबाहेर गेले होते. मात्र, त्यानंतर ते परत न आल्यानं कुटुंबीय चिंतेत होतं. दरम्यान, त्यांच्या मुलीने माध्यमांशी बोलताना वडिलांना यापूर्वी जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे या घटनेला अधिकच संशयाचं वळण मिळालं आहे. आज सकाळी दरेगाव शिवारातील वनविभाग परिसरात एका पार्थिवाची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेथे एक वाहनही आढळून आलं. त्या वाहनाच्या नंबर प्लेटच्या आधारे पार्थिवची ओळख पटवण्यात आली. पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी हे पार्थिव कैलास पवार यांचाच असल्याची अधिकृत पुष्टी केली आहे.
    Maharashtra TimesLatur Crime : दोन चुलत भाऊ खेळण्यासाठी गेले, पुन्हा परतलेच नाहीत, एकाचं पार्थिव घराशेजारी, दुसरा बेपत्ता; लातूरमध्ये अल्पवयीन लेकरांसोबत काय घडलं?

    अटक होईपर्यंत पार्थिव स्वीकारणार नाही

    घटनास्थळी पंचनामा करून पार्थिव पुढील तपासासाठी आणि शवविच्छेदनासाठी शासकीय सामान्य रुग्णालयात हलवण्यात आला आहे. या घटनेनंतर शहरात ही बातमी वेगानं पसरली आणि तालुका पोलीस ठाण्यात नातेवाईकांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे काही काळ वातावरण अत्यंत तणावपूर्ण बनलं होतं. या प्रकरणात पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, मुख्य आरोपींना अटक होईपर्यंत पार्थिव स्वीकारणार नाही, असा ठाम पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. त्यामुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं असून परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
    Maharashtra TimesPune Crime : ‘तुझा नवरा बाहेर गेलाय, आपण मज्जा करू’; पुण्यात रिक्षाचालकाकडून घरात घुसून महिलेसोबत जबरदस्ती, धमकीही दिली
    दरम्यान, या घटनेत चार ते पाच जणांचा सहभाग असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी यासाठी सीआयडीमार्फत तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच, न्याय न मिळाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, लवकरच सत्य समोर येईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या घटनेमुळे संपूर्ण जालना जिल्ह्यात भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा