Pandharpur Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच सोलापुरातील पंढरपूरमध्ये मोठी घटना उघडकीस आली आहे. एका नातीने आपल्या आजीची हत्या केली आहे.
पंढरपूर नातीने आजीची हत्या केली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अरुण बाबर, सोलापूर : ‘तू वारंवार किरकिर का करते?’ या किरकोळ कारणावरून चिडून नातीने आपल्या आजीला लाथा बुक्क्याने मारहाण करून तिचे डोके भिंतीवर आपटून हत्या केल्याची घटना करमाळा तालुक्यातील विहाळ येथे घडली आहे. जनाबाई भगवान सुरवसे (वय ८२, रा. विहाळ ता. करमाळा जि. सोलापुर) असं ठार झालेल्या वृध्द आजीचं नाव आहे. मनिषा रविंद्र लवंगारे (वय ३६, रा. विहाळ ता. करमाळा जि. सोलापूर) असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपी नातीचं नाव आहे. याची फिर्याद हवालदार दिपक हरिश्चंद्र घोरपडे यांनी करमाळा पोलिसांत दिली आहे.
‘तू वारंवार किरकिर करते’
मयत जनाबाई या अर्धांग वायूने आजारी होत्या. त्या सातत्याने तक्रार करत होत्या. यातून चिडून मनिशा लवंगरे हिने आपली आजी जनाबाई भगवान सुरवसे यांना ‘तू वारंवार किरकिर करते’, कारणावरून रात्री साडेअकरा ते पावणेबारा वाजण्याच्या सुमारास शिवगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण करून आजी जनाबाई हिचे डोके धरून भिंतीवर असलेल्या दगडावर आपटूले. गंभीर जखमी झालेली आजी जागीच ठार झाली. यामध्ये करमाळा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. Dharashiv Crime : युवकाला मध्यरात्री संपवलं, २०० मीटर फरपटत नेलं, कृष्णाथ यांच्या हत्येचं गूढ उलगडलं; बायकोनं कुणाच्या सहाय्याने काटा काढला?
मात्र, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत मानेयांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, हवालदार अजहर शेख, दीपक घोरपडे, किरण पाटील यांनी कसून तपास करत व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अभिप्रायावरून मनीषा लवंगारे हिला अटक केली आहे. तसेच तिने आपला गुन्हा देखील कबूल केला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
रीलस्टार सोनाली जाधवचा अनैतिक संबंधातून घात
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील महिलेची बॉडी कालव्यात आढळून आल्याने खळबळ उडाली होती. इन्स्टाग्राम सोशल मीडियावरील रील स्टार असणाऱ्या ३४ वर्षीय सोनाली जाधव हिचा खून झाला होता. अनैतिक संबंधातून प्रियकरानेच तिचा जीव घेतल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे ऐन वाढदिवशीच तिचा मृत्यू झाल्याचं समोर आल्याने हळहळ व्यक्त केली जात होती.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा