• Sun. Jun 7th, 2026

    Yavatmal Crime : मटणाची भाजी अर्धवट शिजली, पती नको ते बोलला, अपमान सहन न झाल्यानं पत्नीचं टोकाचं पाऊल; हसत्या-खेळत्या संसाराची राखरांगोळी

    Yavatmal Crime : मटणाची भाजी अर्धवट शिजली, पती नको ते बोलला, अपमान सहन न झाल्यानं पत्नीचं टोकाचं पाऊल; हसत्या-खेळत्या संसाराची राखरांगोळी

    Yavatmal Crime News : पतीचा स्वभाव हा संशयी असल्याने या आधीही दोघांमध्ये वाद होऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता तर त्याने घातलेल्या वादामुळे पत्नीने जीवन संपवल्याची घटना घडली.

    यवतमाळ क्राईम मटण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    रवी राऊत, यवतमाळ : यवतमाळ तालुक्यातील बोरगाव (दाभडी) येथे एका हृदयद्रावक घटनेत ३० वर्षीय विवाहितेने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. केवळ ‘मटणाची भाजी कच्ची राहिली’ या अत्यंत किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून ही घटना घडली असून, या प्रकरणाने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    नेमकी घटना काय?

    मिळालेल्या माहितीनुसार, मृतक चेतना मनोज जाधव (वय ३०) ही बोरगाव येथे पतीसह राहत होती. घटनेच्या दिवशी तिचा पती मनोज नामदेव जाधव याने बाजारातून मटण आणलं होतं. चेतनाने मटणाची भाजी बनवली, मात्र भाजी कच्ची राहिल्याच्या कारणावरून मनोजने तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद इतका विकोपाला गेला की, त्यातून निर्माण झालेल्या रागाच्या भरात चेतनाने घरात असलेलं विष प्राशन केलं. विष प्यायल्यानंतर चेतनाने स्वतः ही माहिती कुटुंबीयांना दिली. घाबरलेल्या नातेवाईकांनी तिला तातडीने आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र, विष शरीरात भिनल्याने तिची प्रकृती खालावली होती. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासणी अंती तिला मृत घोषित केले.
    Maharashtra TimesPune Crime : नवऱ्याशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, बायकोनं विवाहितेला निर्घृणपणे संपवलं; पतीने CCTV चेक करताच मोठं दृश्य समोर
    दरम्यान, याप्रकरणी मृत चेतनाचे मामा मनोहर गणू राठोड यांनी आर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पती मनोज नामदेव जाधव याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आर्णी ठाणेदार निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पल्लवी निंनगुरकर, सुजित जाधव, प्रदिप खडके व अतुल पवार या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. संसारातील छोट्या-छोट्या कुरबुरींचे रूपांतर कधी अशा भीषण दुर्घटनेत होईल याचा नेम उरला नाही. या घटनेमुळे एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा अंत झाला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
    Maharashtra TimesNagpur Accident : जेवण करुन परतताना काळाची झडप, भीषण अपघातात दोघांचा जागीच अंत; रात्रभर पार्थिव रस्त्यावरच पडलेले

    ‘पुन्हा सुखाने संसार करू’

    मनोज हा दारूच्या आहारी गेला होता. यापूर्वीही २०१५ मध्ये त्याच्यावर कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल झाला होता. २०१७ मध्ये ‘पुन्हा सुखाने संसार करू’ या अटीवर चेतनाने त्याला माफ केले होते. मात्र, बुधवारी झालेल्या अपमानाचा घाव चेतना हिच्या मनाला इतका खोल लागला की, तिने टोकाचे पाऊल उचलले. भरल्या ताटावरून उठून ती आत गेली आणि तिने विषारी औषध प्राशन केले. बाहेर येऊन जेव्हा तिने पतीला ही बाब सांगितली, तेव्हा एकच खळबळ उडाली. ही घटना घडल्यानंतर चेतनाला तातडीने आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा