Nagpur Accident News : राज्यात दिवसेंदिवस अपघाताचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच नागपुरात देखील एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
नागपूर दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जितेंद्र खापरे, नागपूर : नागपूर शहरातील वाढत्या विकासकामांमुळे निर्माण होणाऱ्या धोकादायक परिस्थितीचा आणखी दोन बळी गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठातील दोन विद्यार्थ्यांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला असून, या घटनेमुळे सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सक्षम विनोद बन्सोड (वय २०) आणि आर्यन रवींद्र सोनटक्के (वय २०) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत.
दुचाकी खोल खड्ड्यात कोसळली
दोघेही विधि विद्यापीठाच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत होते आणि वसतिगृहात राहत होते. बुधवारी १५ एप्रिल रोजी रात्री मित्रांसोबत जेवण करून परत येत असताना ही दुर्घटना घडली. वर्धा रोडजवळ निर्जन भागात, अंधारात आणि अपुऱ्या रस्ते व्यवस्थेमुळे त्यांची दुचाकी खोल खड्ड्यात कोसळली. याठिकाणी पूर्वी खाणकाम झाल्यानं मोठा खड्डा तयार झाला असल्याचं समोर आलं आहे. मात्र, त्या ठिकाणी कोणतीही सूचना फलक, सुरक्षा कुंपण किंवा प्रकाशयोजना नव्हती. परिणामी, रात्रीच्या अंधारात तो खड्डा चालकाच्या लक्षात न आल्यानं अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. Pandharpur Crime : ‘तू वारंवार किरकिर करते’; संतापलेल्या नातीकडून आजीला बेदम मारहाण; विठ्ठलाच्या पंढरीत विठुरायाच्या भक्ताला संपवलं
रात्रभर तिथेच पडून राहिले
अपघातानंतर सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, जखमी अवस्थेत दोघांनाही वेळेवर मदत मिळाली नाही. परिसर निर्जन असल्यामुळे ते रात्रभर तिथेच पडून राहिले. सकाळी काही कामगारांना रक्तबंबाळ अवस्थेत त्यांचे पार्थिव आढळून आले. तत्काळ त्यांना एम्स रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेमुळे केवळ कुटुंबीयांवरच नव्हे, तर संपूर्ण विद्यापीठ परिसरावर शोककळा पसरली आहे. सक्षमचे वडील वर्धा येथे सहदिवाणी न्यायाधीश आहेत, तर आर्यनचे वडील यवतमाळ येथे वकिली व्यवसाय करतात. दोघेही कुटुंबातील होतकरू आणि आशादायी विद्यार्थी होते. Dharashiv Crime : युवकाला मध्यरात्री संपवलं, २०० मीटर फरपटत नेलं, कृष्णाथ यांच्या हत्येचं गूढ उलगडलं; बायकोनं कुणाच्या सहाय्याने काटा काढला? दरम्यान, या दुर्घटनेनंतर संबंधित खाण क्षेत्रातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. स्थानिक प्रशासनाने अशा धोकादायक ठिकाणी आवश्यक ती उपाययोजना का केली नाही, याबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून, विद्यार्थ्यांनी वसतिगृहातून बाहेर पडण्याची नेमकी कारणे आणि अपघाताच्या परिस्थितीचा शोध घेतला जात आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा