• Sun. Jun 7th, 2026

    Maharashtra Goverment : मंत्रालयात मंत्र्यांसोबत आता एकाच व्यक्तीला प्रवेश, उपस्थितीसाठी मुख्यमंत्र्यांची पूर्वपरवानगी अनिवार्य, गर्दी नियंत्रणासाठी मोठा निर्णय

    Maharashtra Goverment : मंत्रालयात मंत्र्यांसोबत आता एकाच व्यक्तीला प्रवेश, उपस्थितीसाठी मुख्यमंत्र्यांची पूर्वपरवानगी अनिवार्य, गर्दी नियंत्रणासाठी मोठा निर्णय

    मंत्रालयातील गर्दी टाळण्यासाठी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी मंत्र्यांसोबत केवळ एकाच व्यक्तीला प्रवेश मिळणार असून कार्यकर्त्यांच्या गराड्याला चाप बसणार आहे.

    मंत्रिमंडळ निर्णय(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: मुंबई: मंत्रालयात होणारी कार्यकर्त्यांची जत्रा आणि मंत्र्यांच्या मागे धावणारी पीएंची फौज आता या सगळ्याला चाप बसणार आहे. महाराष्ट्र सरकारने मंत्रालयातील अफाट गर्दी टाळण्यासाठी एक अत्यंत कडक आणि मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीला प्रवेश दिला जाणार आहे. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी याबाबतचे कडक निर्बंध जारी केले असून, सर्व मंत्र्यांना याबाबतच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

    काय आहे नेमकं प्रकरण?

    मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी मंत्रालयात जणू जत्रा भरलेली असते. मतदारसंघातील प्रश्न, कार्यकर्त्यांची कामं आणि पदाधिकाऱ्यांची लगबग यामुळे मंत्रालयाचा सहावा आणि सातवा मजला अक्षरशः गजबजलेला असतो. या गर्दीमुळे कामकाजात मोठा अडथळा निर्माण होत असल्याचं निरीक्षण मुख्य सचिवांनी नोंदवलं आहे. याच गर्दीला ‘ब्रेक’ लावण्यासाठी आता सरकारने नियमावली कडक केली आहे.

    नवे नियम

    केवळ एकच व्यक्ती: मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी मंत्र्यांसोबत त्यांच्या कार्यालयातील केवळ एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत एन्ट्री मिळेल. इतर पीए किंवा कार्यकर्त्यांना बाहेरच थांबावं लागेल.

    Maharashtra TimesNashik TCS Case : टीसीएस कंपनी ‘डेलॉईट-ट्रायलीगल’मार्फत नाशिक प्रकरणाची सखोल चौकशी करणार, निदा खानबद्दलही मोठा खुलासा; अधिकृत निवेदनात काय सांगितलं?

    मुख्यमंत्र्यांची परवानगी अनिवार्य

    जर एखाद्या विशेष व्यक्तीला बैठकीला उपस्थित राहायचं असेल, तर मुख्यमंत्र्यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. त्याचे कागदपत्र सुरक्षा अधिकाऱ्यांना दाखवल्याशिवाय आत पाऊल ठेवता येणार नाही.

    आमदार-खासदारांसाठी काय नियम?

    जर बैठक ‘सह्याद्री’ अतिथीगृहावर असेल, तर फक्त आमदार आणि खासदारांनाच वेटिंग रूममध्ये बसता येईल. त्यांच्या स्वीय सहायकांना (PA) परिसरात फिरण्यासही मनाई करण्यात आली आहे. मंत्रिमंडळ बैठकीच्या आधी आणि नंतर २ तास सातव्या मजल्यावर किंवा मंत्रिमंडळ सभागृहात कोणतीही इतर बैठक घेता येणार नाही.

    गर्दीचा प्रश्न खरंच सुटणार?

    मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व बड्या सचिवांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत गांभीर्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्र्यांच्या अवतीभोवती घोटाळणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गराड्यामुळे अनेकदा महत्त्वाच्या फायलींची ने-आण करताना अडथळे येतात. आता या नव्या निर्णयामुळे मंत्रालयात ‘फिल्डिंग’ लावणाऱ्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का मानला जात आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा