• Mon. Jun 15th, 2026
    देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चौघं गंभीर; कारण अस्पष्ट

    Jalgaon Family Accident Death : उज्जैन ओंकारेश्वर येथील देवदर्शन करुन मूळ गावी परत येत असताना झालेल्या अपघातात वरणगाव येथील तिघांचा मृत्यू झाला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जळगाव : मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील बोरगाव परिसरात शुक्रवारी पहाटे सुमारे पाच वाजता झालेल्या भीषण कार अपघातात जळगाव जिल्ह्यामधील भुसावळ तालुक्यातील वरणगाव फॅक्टरी परिसरात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर चौघे गंभीर जखमी झाले. या अपघाताने संपूर्ण वरणगाव आणि दर्यापूर शिवार परिसरावर शोककळा पसरली. अपघातग्रस्त ठाकूर कुटुंबाच्या घरी नातेवाईक आणि शेजार्‍यांनी मोठी गर्दी केली होती.

    कारवरील नियंत्रण सुटल्याचा अंदाज

    उज्जैन ओंकारेश्वर आणि सीओ येथील देवदर्शन करुन मूळ गावी परत येत असताना झालेल्या अपघातात वरणगाव येथील तिघांचा मृत्यू झाला. वरणगाव येथील श्याम विक्रम ठाकूर (वय 45), शोभा विक्रम ठाकूर (वय 60) व शिवन्या श्याम ठाकूर (वय 5) अशी मृतांची नावे आहेत. प्रवासादरम्यान पहाटेच्या सुमारास वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यावर पलटी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, मात्र अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
    Maharashtra TimesPune Crime : पतीशी प्रेमसंबंधाचा संशय, पत्नीने पुण्यातील विवाहितेला हाल-हाल करुन मारलं, सहा तासात पोलिसांच्या जाळ्यात, दोन क्ल्यू निर्णायक

    अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

    अपघाताच्या वेळी कार चालवणाऱ्या श्याम ठाकूर यांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या शोभाबाई ठाकूर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचीही प्राणज्योत मालवली. लहानगी शिवन्या हिला बर्‍हाणपूर येथील खाजसगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु उपचार सुरू असताना तिनेही प्राण सोडले झाला. या अपघातात चार भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

    श्रीकांत शिंदेंसमोर शिवसेना कार्यकर्त्यांची नाराजी, बालाजी कल्याणकरांनी आरोप फेटाळले

    परिसरात शोककळा, नातेवाईकांचा आक्रोश

    दर्यापूर शिवारातील गणेश नगर आणि वरणगाव फॅक्टरी परिसरात या घटनेची माहिती पोहोचताच शोककळा पसरली. ठाकूर कुटुंबाच्या घरी नातेवाईक आणि शेजार्‍यांची मोठी गर्दी झाली.
    Maharashtra TimesAmravati Crime : हाय हॅलो करत बसायचं नाही, एकच प्रश्न थेट विचारायचा; अयानला ‘लव्ह गुरु’च्या टिप्स, 500 रुपयात ‘रुम’ देणाराही सापडला

    स्थानिक पोलिसांची धाव

    अपघाताची माहिती मिळताच मध्य प्रदेशातील स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. बॉडी ताब्यात घेऊन वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये शवविच्छेदन करण्यात आले आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा