• Mon. Sep 7th, 2026

समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, वाहतूक नियमांची पायमल्ली ठरतेय अपघातांना निमंत्रण

समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, वाहतूक नियमांची पायमल्ली ठरतेय अपघातांना निमंत्रण

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

​कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात आज दुपारी समृद्धी महामार्गावर कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला.या अपघातात शिर्डी येथील प्रसिद्ध उद्योजक जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नी अनुराधा शेळके यांचा जागीच मृत्यू झाला.समृद्धी महामार्गावर उभे असलेल्या कंटेनरटला मागून धडक देत कार थेट कंटेनरखाली गेली. नियमानुसार समृद्धी महामार्गावर वाहने थांबवण्यास प्रतिबंध आहे तरी वाहतूक नियमांची पायमल्ली करत वाहने थांबत आहे. तसेच ट्रक वाले आपली लेन सोडून दुसऱ्या लेनमध्ये चालत असल्याने ते देखील अपघाताला कारण ठरत आहे. त्यामुळे ट्रक चालक आणि वाहन चालकांना समृद्धी महामार्गावर मार्गदर्शन करणारी पथक नेमणूक करण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed