• Fri. Jun 5th, 2026
    नाशिक IT कंपनीतील धर्मांतरण प्रकरणाचा तपास आता ATS कडे; ‘टेरर फंडिंग’चा संशय

    नाशिकमधील IT कंपनीतील धर्मांतरण प्रकरणाचा तपास आता ATS करत आहे. ATS ने एसआयटीकडून आरोपी शफी शेख आणि रझा मेमन यांना ताब्यात घेतलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जयेश साबळे, नाशिक : नाशिकच्या IT कंपनीतील धर्मांतरण आणि महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आरोपी शफी शेख आणि रझा मेमन यांना ATS म्हणजेच दहशतवाद विरोधी पथकाकडून ताब्यात घेण्यात आलं आहे. एटीएसने एसआयटीकडून दोन्ही आरोपींचा ताबा घेतला आहे. एटीएस या प्रकरणी आता धर्मांतरण आणि अत्याचार प्रकरणात रॅकेट, आंतरराष्ट्रीय कनेक्शन, टेरर फंडिंगचा संशय या अँगलने तपास करणार आहे.

    नेमकं प्रकरण काय?

    नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत समोर आलेल्या धर्मांतरण आणि महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणाची व्याप्ती आणि त्यातील संभाव्य देशविघातक धागेदोरे पाहता, याचा तपास आता दहशतवादी विरोधी पथक अर्थात ATS ने आपल्या हाती घेतला आहे. एटीएसने या प्रकरणातील दोन्ही मुख्य संशयित आरोपी शफी शेख आणि रजा मेमन यांचा ताबा घेतला आहे.या प्रकरणाच्या तपासाठी नाशिक पोलिसांनी यापूर्वी विशेष तपास पथकाची म्हणजेच SIT ची नियुक्त केली होती. प्राथमिक तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्यानंतर राज्य सरकारने हे प्रकरण एटीएसकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.

    एटीएसला नेमका संशय काय?

    एटीएसने अधिकृतरीत्या SIT कडून आरोपींचा ताबा घेऊन चौकशीचे चक्र फिरवले आहे. तपास यंत्रणांना संशय आहे की, हे केवळ धर्मांतरणाचे वैयक्तिक प्रकरण नसून, त्यामागे एक मोठे संघटीत रॅकेट कार्यरत आहे. आरोपींच्या हालचाली आणि संपर्कावरून याचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेषतः या कृत्यासाठी ‘टेरर फंडिंग’साठी वापरले गेले आहे का? या दृष्टीने देखील ATS सखोल तपास करत आहे.

    IT कंपनीत कामाला असलेल्या महिला कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून त्यांचे धर्मांतर करणे आणि नकार दिल्यास त्यांचे लैंगिक शोषण करणे, अशा स्वरूपाचे गंभीर आरोप सदर संशयित आरोपींवर आहे. या प्रकरणातील पीडितांची संख्या मोठी असण्याची शक्यता आहे. आरोपींच्या चौकशीतून अनेक बड्या नावांचा आणि मोठ्या कटाचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे नाशिकच्या औद्योगिक आणि आणि सामाजिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

    जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन

    दरम्यान, नाशिकच्या नामांकित कंपनीतील धर्मांतरण दबाव, धार्मिक भावना दुखावणे आणि महिला अत्याचार प्रकरणाचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्याकडून निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी हातात निषेधाचे बॅनर घेऊन, जोरदार घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आले. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई केली जावी, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आणि जिल्हाधिकारी यांना याबाबत निवेदन देखील देण्यात आले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा