Nanded Accident News : नांदेड शहरातील देगलुर नाका भागात नाल्याच्या पाण्यात बुडून चार लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
देगलूर चार मुलांचा बुडून मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अर्जुन राठोड, नांदेड : नांदेडमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पोहण्यासाठी गेलेल्या चार शाळकरी मुलांवर काळाने घाला घातला. पाण्याचा अंदाज न आल्यानं चारही जणांचा मृत्यू झाला आहे. आज गुरुवारी सकाळी ११ वाजता नांदेड शहरातील देगलूर नाका इस्लामपुरा भागातील हारूनबाग परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. घटनेची माहिती मिळताच जीवरक्षकांनी चारही मुलांना पाण्याबाहेर काढले. मोहम्मद अली (वय १३ वर्ष), मोहम्मद फुरखान (वय १८ वर्ष ), मोहम्मद अदनान (वय ८ वर्ष) आणि मोहम्मद रेहान (वय ११ वर्ष) अस मृतकांची नावे आहेत. मृतकांमध्ये तीनजण एकाच कुटूंबातील असून दोन सख्खे भाऊ असल्याची माहिती आहे. या घटनेनं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नेमकं काय घडलं?
देगलूर नाका भागातील हारूनबाग परिसरात एका नाल्याचं काम सुरु आहे. या कामासाठी एका खासगी कंत्राटदाराकडून १० ते १५ फूट खोल खड्डा देखील खोदण्यात आला होता. सद्या काम थांबल्यानं या खड्यात मोठ्या प्रमाणात पाणी देखील साचलं आहे. आज सकाळी मोहम्मद अली, मोहम्मद फुरखान, मोहम्मद अदनान आणि मोहम्मद रेहान हे चारही जण खेळण्यासाठी जात होते. खड्ड्याजवळ येताच त्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही. चारही जणांनी कपडे एका चेंबरवर ठेवून सर्वजण पाण्यात उतरले. Nashik Accident : वडील अंध, अल्पवयीन मुलावर घराची जबाबदारी, काळाने त्यालाही हिरावलं; भीषण अपघातात चेतनचा करुण अंत
गाळ असल्यानं खालीच अडकले
मात्र, पाण्यात मोठ्या प्रमाणात गाळ असल्यानं आणि त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यानं चारही जण बुडाले. या घटनेची माहिती मिळताच तरुणांनी पाण्यात उतरून चारही जणांना बाहेर काढलं. ही घटना वाऱ्यासारखी पसरल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. अग्निशमन दलाकडून खड्ड्यातील पाणी मोटारीने बाहेर काढण्यात आलं. या भागात महापालिकेकडून खासगी कंत्राटधारामार्फत नाल्याचं काम सुरु आहे. बाजूला प्लॉटिंग आहे. हा खड्डा नेमका खोदला कोणी? याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेला जबाबदार कोण? त्याची चौकशी केली जात आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा