पुन्हा एकदा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत चालली आहे. अशातच उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यासाठी जिल्हाधिकारी अशीमा मित्तल आणि पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी केली जरांगेंची भेट घेतली. समाजाला तुमची गरज आहे, त्यामुळे तुम्ही उपोषण सोडा, असे म्हणत जिल्हाधिकाऱ्यांनी जरांगेंना विनंती केली. यावेळी अशीमा मित्तल यांनी राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात कोणकोणती पावले उचलली आहेत, याचा पाढा वाचला. ज्यामुळे जरांगे हे काहीसे वैतागलेले दिसले.