• Wed. Sep 2nd, 2026

Alibag District Hospital:अलिबाग जिल्हा रुग्णालयात रुग्णाच्या अंगावर स्लॅब कोसळण्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. विशेष म्हणजे या रुग्णालयाच्या इमारतीची नोंद ही धोकादायक इमारतींमध्ये करण्यात आली होती. या प्रकरणात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी प्रशासनाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.वृत्तसेवा,अलिबाग:अलिबाग येथील शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या अंगावर मंगळवारी पहाटे चक्क स्लॅबचा भाग कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत श्रीवर्धन येथील सुनील अवरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयातील रुग्णसुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

अंगावर स्लॅबचा भाग कोसळला

काही दिवसांपूर्वी सुनील अवरे यांच्या मोटारसायकलला अपघात झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा झाल्याने मंगळवारी दुपारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार होते. पहाटे सुमारे चारच्या सुमारास ते झोपेत असताना अचानक त्यांच्या अंगावर स्लॅबचा भाग कोसळला. या घटनेत त्यांच्या डोक्याला दुखापत झाली.

रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न उपस्थित

रुग्णाच्या अंगावर स्लॅब कोसळून तो जखमी झाल्याच्या घटनेनंतर सुमारे पाच तास उलटूनही पोलिसांना याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नसल्याची चर्चा रुग्णालय परिसरात होती. याबाबत रुग्णालय प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. काही दिवसांपूर्वी एका राजकीय पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला होता.

Maharashtra TimesSangli Crime : पांढऱ्या द्रवाचा अंश अन् उग्र वास, पती-पत्नीचा एकामागून एक संशयास्पद मृत्यू, कदम कुटुंबावर शोककळा

धोकादायक इमारतींमध्ये होता समावेश

जून २०२६ मध्येही रुग्णालयाचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली होती. तसेच २०२४ मध्ये अलिबाग नगरपालिकेने धोकादायक इमारतींना बजावलेल्या नोटिशीत जिल्हा रुग्णालयाचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले होते. गेल्या काही वर्षांत रुग्णालयाच्या इमारतीवरकोट्यवधी रुपयेखर्च होऊनही बांधकामाच्या सुरक्षेबाबत प्रश्न कायम असल्याने या घटनेनंतर प्रशासनाच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Maharashtra TimesThane News : कळवा रुग्णालयात जेवणात सापडले झुरळ;अन्नाचे नमुने FDA कडे रवाना ,डेळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल असलेल्या रुग्णाच्या जेवणात आढळला हा प्रकार

त्रुटींची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी

याशिवाय, रुग्णालयातील मंजूर १९४ पदांपैकी तब्बल ९९ पदे रिक्त असल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती. विद्युत सुरक्षेचे ऑडिट झाले नसल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे रुग्णालयातील पायाभूत सुविधा, विद्युत सुरक्षा आणि मनुष्यबळ या तिन्ही पातळ्यांवरील त्रुटींची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी होत आहे.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.… आणखी वाचा