• Sat. Jun 6th, 2026
    Pune Crime : ‘आधी कोण झोपणार?’ यावरुन जोरदार वाद, सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला मध्यरात्री संपवलं; पुण्यात नेमकं काय घडलं?

    Pune Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच पुण्यात पुन्हा एकदा एक मोठी घटना समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

    खराडी सोसायटी सिक्युरीटी हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : पुण्यातल्या खराडी भागात एक मोठी घटना घडली आहे. रात्रपाळीत काम करत असताना ‘आधी कोण झोपणार?’ या साध्या कारणावरून दोन सुरक्षारक्षकांमध्ये एवढा मोठा वाद झाला की त्यातून थेट हत्येची घटना घडली. पांडुरंग खारवणे (वय ५२, रा. मांजरी बुद्रुक) आणि सुदर्शन काळे (वय २२, रा. खराडी) हे दोघे एका सोसायटीत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होते. दि. १२ एप्रिल रोजी रविवारी रात्री दोघांची एकत्र रात्रपाळी होती. काम करताना थोडा आराम मिळावा म्हणून त्यांनी आधीच ठरवलं होतं की रात्री १२ ते सकाळी ६ या वेळेत आळीपाळीने तीन-तीन तास झोप घ्यायची.

    ‘आधी कोण झोपणार?’

    पण रात्री उशिरा ‘आधी कोण झोपणार?’ यावरून दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. सुरुवातीला हा साधा वाद होता, पण हळूहळू तो चांगलाच पेटला. दोघेही एकमेकांवर ओरडायला लागले. राग अनावर झाल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली. संतापाच्या भरात सुदर्शन काळे याने आपल्या गळ्यातील गमजा काढला आणि तोच गमजा खारवणे यांच्या गळ्याला घट्ट आवळला. काही क्षणातच खारवणे खाली कोसळले आणि बेशुद्ध पडले. हा प्रकार पाहून काळे घाबरला.
    Maharashtra TimesMumbai Crime : स्वप्नांचे शहर असणाऱ्या मुंबईची ‘काळी’ बाजू, झगमगाट कॉन्सर्टमध्ये काय-काय घडत होतं? वाचा A टू Z प्रकरण

    आरोपीला तत्काळ अटक

    घाबरलेल्या अवस्थेत त्याने तत्काळ पोलीस कंट्रोल रूमला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खारवणे यांना ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. छोट्याशा कारणावरून एका व्यक्तीचा जीव गेला, यामुळे नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मृताच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी सुदर्शन काळे याला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे. दरम्यान छोट्या गोष्टींच्या रागातून असे विकृत कृत्य होत आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
    Maharashtra TimesSolapur Crime : मी आणि सोनाली काल रात्री झोपलो, आता ती उठत नाहीये; जावयाचा घाबराघुबरा फोन; सासऱ्यांना संशय येताच मोठा ट्विस्ट

    प्रेमसंबंधाचा गैरफायदा!

    शहरातील महिलांवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. एकीकडे राज्यभारत भोंदूबाबाच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. दररोज महिला आणि मुलींची होणारी फसवणूक चिंता वाढवत आहे. पुणे हे सांस्कृतिक शहर मानले जाते. मात्र याच शहरात महिला असुरक्षित आहेत आणि याची रोज उदाहरणे आपल्याला ऐकायला मिळत असतात. अशातच पुण्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात POCSO कायद्याअंतर्गत विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा