• Sat. Jun 6th, 2026

    Mumbai Metro 14: शहरातील सर्वात लांब मेट्रो पुन्हा मार्गी! कांजूर मार्ग-बदलापूर मेट्रोसाठी नव्या सल्लागाराचा शोध; नवी मुंबईलाही जोडणार

    Mumbai Metro 14: शहरातील सर्वात लांब मेट्रो पुन्हा मार्गी! कांजूर मार्ग-बदलापूर मेट्रोसाठी नव्या सल्लागाराचा शोध; नवी मुंबईलाही जोडणार

    Kanjurmarg-Badlapur Metro: मेट्रो लाइन 14 च्या जुन्या गोंधळानंतर आता ही मेट्रो पुन्हा मार्गी लागणार असल्याचे संकेत आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई शहरांना या मेट्रो मार्गिकेमुळे जोडणी मिळणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. वृत्तसेवा, ठाणे: मुंबई ते बदलापूर अशा थेट प्रवासाची सुविधा असणाऱ्या बहुचर्चित कांजूर मार्ग-बदलापूर मेट्रो प्रकल्पासाठी नव्या सल्लागार तज्ज्ञाची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने निविदा मागवल्या आहेत.

    शहरातील सर्वाधिक अंतर असणार मेट्रो मार्ग

    महामुंबई परिसरातील हा सर्वाधिक अंतराचा मेट्रो मार्ग असणार असून त्यामुळे बदलापूर परिसरातून मुंबईला जाणाऱ्या लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. या मेट्रो १४ मार्गिकेच्या उभारणीसाठी पुन्हा नव्याने प्रकल्प अहवालाचे पुनर्विलोकन केले जाणार आहे. यापूर्वी या मेट्रोबाबत प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. आता त्या अहवालाची समीक्षा केली जाईल. अंदाजपत्रक आणि सर्वेक्षण केले जाणार आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई अशा विविध मेट्रो प्रकल्पांना जोडणारी ही एकमेव मेट्रो मार्गिका आहे.Maharashtra TimesPune Metro: कोथरुडकरांसाठी गुड न्यूज! ‘मेट्रो लाईन 4आणि 4ए’चा आराखडा सादर; कोथरुड, वारजे, कर्वेनगरमध्ये उन्नत मार्गिका

    ठाणे-भिवंडी-कल्याण ५ ही मेट्रो आणि कल्याण ते तळोजा १२ या मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. मेट्रो १४मुळे कल्याण पलीकडच्या शहरातील प्रवाशांचा लाभ होणार आहे. कांजूर मार्ग ते बदलापूर दरम्यान धावणारी ही मेट्रो वेगाने मार्गी लावण्यासाठी एमएमआरडीएने प्रकल्प अहवाल पुनर्विलोकनासाठी निविदा मागवल्या आहेत. एमएमआरडीएने यापूर्वी २०१९मध्ये मे. मेट्रो मिलानो कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेडची नियुक्ती केली होती. सल्लागारांनी एमएमआरडीएला व्यवहार्यता अहवाल सादर केला होता.

    एमएमआरडीएने व्यवहार्यता अहवाल आयआयटी मुंबईकडे पुनरावलोकनासाठी सादर केला. त्यानंतर आयआयटी मुंबईने व्यवहार्यता अहवालावर मत नोंदवले. डिसेंबर २०२५मध्ये एमएमआरडीएने हा सल्लागार करार रद्द केला होता. त्यामुळे पुन्हा आता या अहवालाचे पुनर्विलोकन केले जाणार आहे.

    लाखो प्रवाशांची होणार सोय

    मुंबई महानगर प्रदेशातील झपाट्याने विकसित होणाऱ्या बदलापूर परिसरातील लाखो प्रवाशांना मुंबईत जाण्यासाठी सध्या तरी उपनगरीय रेल्वेशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही. मेट्रोमुळे येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याचे प्रयत्न एमएमआरडीए प्रशासन करीत आहे.

    Maharashtra TimesMumbai Metro 5: भिवंडी शहरात पहिल्यांदाच धावणार मेट्रो, ठाणे-भिवंडी ‘मेट्रो लाइन 5’ला वेग; डेडलाइनही आली समोर

    … असा असेल मट्रामार्ग

    कांजूर मार्ग ते ज्युवेली गाव, बदलापूर
    मार्गाची एकूण लांबी : ४३.६९ किमी
    प्रस्तावित स्थानकांची संख्या : २४ (कांजूर मार्ग येथे एक भूमिगत स्थानक).
    मेट्रोची रचना : सहा डब्यांची गाडी
    कमाल वेग: ९० किमी प्रति तास
    वाहतुकीचा सरासरी वेग : ५५ किमी प्रतितास

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा