Nashik Crime: सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या हव्यासापोटी आणि दहशत निर्माण करण्यासाठी ‘रील’ बनवण्याचे वेड सध्या तरुणाईच्या अंगाशी येत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
पुण्यातील एका गुन्हेगाराने शस्त्रांसह मारहाण करीत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. नाशिकमधील संशयित रुपेश रवींद्र तायडे (२०, रा. गंगापूर रोड), जीवक व्यंकट कांबळे (२१, रा. सिडको), साहिल ज्ञानेश्वर वायदंडे (२०, रा. गंगापूर रोड) आणि प्रेम बळीराम भदरगे (२०, रा. पारिजातनगर) या चौघांनी तो मूळ व्हिडीओ डाउनलोड केला. तंत्रज्ञानाचा गैरवापर करून त्यांनी व्हिडीओत मूळ गुन्हेगाराच्या जागी स्वतःचे चेहरे चिकटवले. इतकेच नव्हे, तर गुगल मॅपवर नाशिकचा ‘कॉलेज रोड’ परिसर हायलाइट करून ‘या रगेलांच्या नादी लागू नका’ अशा आशयाची पोस्ट इन्स्टाग्रामवर व्हायरल केली. या कृत्यामुळे परिसरात घबराट पसरली असून, सार्वजनिक शांततेचा भंग झाला.
Nashik Crime: तोंड झाकून महिला घरी आली, उकळतं तेल 20 वर्षीय तरुणीच्या अंगावर फेकलं; स्कार्फ काढताच सर्वांनाच धक्का
विशेष म्हणजे हे चौघेही संशयित उच्चशिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत. गंगापूर पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे या चौघांचा माग काढून त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी केवळ कायद्याचा बडगाच उगारला नाही, तर त्यांच्या पालकांनाही पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. पोलिस ठाण्यातच पालकांनी या तरुणांना चांगलीच ‘शिकवण’ दिल्याने त्यांच्या डोक्यातील ‘भाईगिरी’चे भूत उतरले. दरम्यान, पुण्यातील मूळ रील तयार करणाऱ्यांवरही आता कारवाईची टांगती तलवार असून, नाशिक पोलिसांच्या या भूमिकेमुळे रीलबाजांचे धाबे दणाणले आहे.
Nashik Accident: जागरण-गोंधळावरुन परतताना काळाचा घाला! पिकअपने घेतला पेट; नवदाम्पत्यासह चौघांचा होरपळून मृत्यू, 7 जण जखमी
सोशल मीडियावर भाईगिरी किंवा दहशतीचे उगात्तीकरण करणाऱ्या रील्स पोस्ट करू नका. तरुणांचे संपूर्ण करिअर आणि भविष्य उद्ध्वस्त होऊ शकते. समाजविघातक कृत्य करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. -अशोक शरमाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक,
