• Mon. Jun 15th, 2026

    Marathwada Earthquake: सकाळी अचानक घराला हादरे! मराठवाड्यात भूकंपाचे धक्के; नांदेड, परभणी, हिंगोलीमध्ये नागरिकांची तारांबळ

    Marathwada Earthquake: सकाळी अचानक घराला हादरे! मराठवाड्यात भूकंपाचे धक्के; नांदेड, परभणी, हिंगोलीमध्ये नागरिकांची तारांबळ

    Maharashtra Earthquake: शनिवारी सकाळी राज्याती काही जिल्ह्यांत भूकंपाचे धक्के जाणवल्याने एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांची तारांबळ उडाली असून शनिवारी सकाळी भीतीचे वातावरण पसरले होते.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नांदेड/हिंगोली/परभणी: मराठवाड्यात शनिवारी अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के बसल्याने एकच खळबळ उडाली आहे. हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये सकाळी 8.45 ते 8.46दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यामुळे सकाळी-सकाळीच नागरिकांची तारांबळ उडाली होती. एकाच वेळी राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये हादरे बसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होती. भूकंपाची तीव्रता कमी असल्यामुळे सध्या कोणतेही नुकसान किंवा जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

    केंद्र हिंगोली जिल्ह्यात

    भुकंपाचे केंद्र हिंगोली जिल्ह्यातील पांग्रामध्ये असल्याची माहिती सध्या समोर आली आहे.पांग्रा गावात भुकंपाची रिस्टर स्केलवर 4.7 तीव्रतेची नोंद झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली शहर, वसमत, औंढा आणि कळमनुरी तालुक्यात 11 एप्रिल रोजी भुकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान, एकाच मिनिटांत परभणी जिल्ह्यातील काही भागांत आणि नांदेडमध्येही जमिनीला कपं जाणवले. यामुळे तीनही जिल्ह्यांमध्ये सकाळी एकच खळबळ उडाली होती.दरम्यान, या भूकंपाचा परिणाम विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही पहायला मिळाला. यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातही सकाळी हादरे बसले होते. दरम्यान, वाशिम शहरातील आजूबाजूच्या परिसरातही धक्के जाणवेल. तसेच, पुसद तालुक्यातील शेबाळ पिंपरी भागांतसुद्धा शनिवारी भूकंपाचे हादरे जाणवले. सकाळी घरातील भांडी अचानक पडू लागल्याने नागरिकांना भूकंपाची जाणीव झाली. त्यानंतर मराठावाड्यात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन गावकऱ्यांची धावाधाव सुरू झाली.

    हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील काही गावांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून भूगर्भातून गूढ आवाज येण्याचे सत्र सुरूच आहे. एक-दोन दिवस झालं या गावांमध्ये हादरे जाणवत होते.

    परभणी जिल्ह्यातही हादरे

    परभणी शहरासह परिसरात शनिवारी सकाळी आठ वाजून 44 मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. दरम्यान तालुका व जिल्हा महसूल प्रशासनाने या संदर्भात अद्याप अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, मात्र कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये अशी माहिती देण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी अफवा, खोटे फोन कॉल, अथवा अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती अधिकृत स्त्रोतांकडूनच घ्यावी असेहे निर्देश देण्यात आले आहेत.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा