Pune Water Supply Water Cut Schedule : पुणेकरांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आजपासून पुणेकरांना पाणीकपातीला सामोरं जावं लागणार आहे. महापालिकेनं नागरिकांना काय आवाहन केलंय? ते जाणून घ्या
पुणे महापालिका पाणीकपात वेळापत्रक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पाऊस लांबल्याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर झाला असून, शहरात आज, सोमवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. सम-विषम तारखेनुसार शहरात पाणीपुरवठ्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. पाणीकपातीचा पहिलाच दिवस असल्याने आज, सोमवारी शहरात पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना पेरण्या पुढे ढकलण्याचे आवाहन
पुणे महापालिका क्षेत्राला प्रामुख्याने खडकवासला धरणसाखळीतून पाणीपुरवठा केला जातो. याशिवाय पूर्व पुण्याला भामा आसखेड धरणातूनही पाणी पुरवले जाते. यंदा १५ जून उजाडला, तरी शहरात पावसाने हजेरी लावलेली नाही. यंदाच्या वर्षी ‘एल निनो’ सक्रिय असल्याने देशात पर्जन्यमान कमी राहणार असल्याचे हवामान विभागाने पूर्वीच स्पष्ट केले आहे. लांबलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही शेतकऱ्यांना पेरण्या पुढे ढकलण्याचे आवाहन केले आहे. उपलब्ध पाणीसाठा ऑगस्टपर्यंत पुरेल असे नियोजन करण्याच्या सूचना सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आल्या आहेत. Pune International Airport: पुनर्बांधणीच्या कामांदरम्यान पुणे विमानतळ सुरू राहणार, जुनं टर्मिनलही लवकरच खुलं करणार; प्रवाशांना मोठा फायदा होणार सध्या महापालिका धरणांतून दररोज सुमारे १६०० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी उचलते. कपातीनंतर हा पुरवठा दररोज सुमारे ११०० ते १२०० एमएलडीपर्यंत आणण्याचे उद्दिष्ट आहे. सम-विषम तारखेनुसार पाणीकपातीचे वेळापत्रक पालिकेच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. भामा-आसखेड प्रकल्पातून पाणीपुरवठा होणाऱ्या उत्तर-पूर्व भागाला तांत्रिक अडचणींमुळे सध्या या कपातीच्या नियोजनातून वगळण्यात आले आहे.
कारवाईचा इशारा
पाणीटंचाईचा गैरफायदा घेऊन नागरिकांची अडवणूक किंवा कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या टँकरचालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. Pune Crime : बँकांनी जप्त केलेल्या डीएसकेंच्या आलिशान कार स्वस्तात देण्याचे आमिष, पुण्यातील एजंटकडून तरुणाची फसवणूक
नागरिकांना आवाहन
नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा
नळ-टाक्यांची गळती तातडीने दुरुस्त करावी
अनधिकृत नळजोडांची माहिती पालिकेस द्यावी
पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लो होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
तक्रारींसाठी १८००-१०३०-२२२ या कॉल सेंटरवर संपर्क साधावा
‘स्मार्ट मीटर’ मोहिमेला वेग
राज्यभरातील सर्व वीजग्राहकांचे पारंपरिक वीजमीटर बदलून स्मार्ट मीटर मोफत बसविण्याच्या मोहिमेला ‘महावितरण’ने गती दिली आहे. त्या अंतर्गत थेट व्हॉट्सअपवर अधिकृत मेसेज पाठवून मीटर बदलण्याच्या प्रक्रियेची पूर्वसूचना देण्यात आली आहे. हा मेसेज मिळालेल्या ग्राहकाकडे ४८ तासांनंतर स्मार्ट मीटर बसविण्यात येईल, असा दावा ‘महावितरण’ने केला आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा