• Sat. Jun 6th, 2026
    नाशिक धर्मांतर प्रकरणातील HR आश्विनी चैनानी पुण्यातून अटक, पीडिता तक्रार करताच जाणीवपूर्वक वाढवायचे वर्कलोड

    Nashik Women Assault and Conversion Racket : बहुराष्ट्रीय कंपनीतील अत्याचार, विनयभंग आणि धर्मांतराचा प्रयत्न याबाबत नाशिक शहरातील देवळाली कॅम्प पोलिसांत एक आणि मुंबई नाका पोलिस ठाण्यात आठ असे नऊ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : आठ तरुणींसोबत लैंगिक जवळीक साधून एकीवर अत्याचार करीत तिच्यासह एका तरुणाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न झालेल्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीच्या ‘एचआर’ आश्विनी चैनानी (वय ५१) हिला नाशिक पोलिसांनी पुणे येथून अटक केली. तिला नाशिक जिल्हा न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, उर्वरित पाच पुरुष संशयितांची रवानगी नाशिकरोड कारागृहात करण्यात आली आहे. ‘एचआर’ने पीडितांच्या ई-मेलवरील तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यासह त्यांना जाणीवपूर्वक ‘वर्कलोड’ दिल्याचे तपासात समोर येत आहे.

    सहा पुरुषांना पोलिसांच्या बेड्या

    बहुराष्ट्रीय कंपनीतील अत्याचार, विनयभंग आणि धर्मांतराचा प्रयत्न याबाबत नाशिक शहरातील देवळाली कॅम्प पोलिसांत एक आणि मुंबई नाका पोलिस ठाण्यात आठ असे नऊ गुन्हे नोंद आहेत. त्यामध्ये आठ महिला व एक पुरुष फिर्यादी असून, आतापर्यंत सहा पुरुषांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्यानुसार आसिफ अन्सारी, शफी शेख, रझा मेमन, तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी हे ‘एसआयटी’च्या कोठडीत होते. तर, संशयित दानिश शेख हा पहिल्या गुन्ह्यातील पोलिस कोठडीनंतर नाशिकरोड कारागृहात असून, संशयित निदा खान ही अजूनही पसार आहे.दरम्यान, दानिश वगळता इतर पाच जणांना दुसऱ्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर न्यायालयाने १० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यामुळे शुक्रवारी (दि. १०) त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यासह मुंबई नाका पोलिसांत दाखल एका गुन्ह्यात संशयित ‘एचआर’ अश्विनी अशोक चैनानी (वय ५१, रा. प्रकाश अपार्टमेंट, लुलानगर, पुणे) हिलासुद्धा अटकेनंतर न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयातील दिवाणी न्यायाधीश आणि अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आर. सी. नरवाडिया यांच्या न्यायकक्षात युक्तिवाद झाला. त्यावेळी सरकारी पक्षातर्फे सहाय्यक संचालक किरण बेंडभर आणि सहाय्यक सरकारी अभियोक्ता अनिकेत आव्हाड यांनी युक्तिवाद केला. तर, संशयितांच्या बाजूने वकील राहुल कासलीवाल, बाबा सिद्दीकी, हानिद शेख यांनी युक्तिवाद केला.
    Maharashtra TimesCrime News : नवरा शरीरसंबंध ठेवत नाही, सारखा बाथरुममध्ये असतो, बायकोचा आरोप, मेडिकल फाईल तपासताच पायाखालची जमीन सरकली
    यापूर्वी पोलिसांनी संशयितांना दोन वेळा पोलिस कोठडी मागितली असून, आतापर्यंत सबळ पुरावे सादर झालेले नाहीत. यासह संशयित तपासात सहकार्य करीत नाहीत, हा वाढीव पोलिस कोठडीसाठी मुद्दा योग्य नसल्याचा युक्तिवाद झाला. न्यायालयाने त्यानुसार पाचही पुरुष संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली. पाचही संशयितांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.

    Babanrao Lonikar | सरपंचांनी पाणीपुरवठा केला नाही तर नागरिकांनी थेट सरपंचाच्या घरावर मोर्चा काढावा

    कंपनीतून घेतले ताब्यात

    गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद होताच कंपनीतील संशयित ‘एचआर’ अश्विनी चैनानी हिला ताब्यात घेण्यासाठी नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या ‘एसआयटी’चे एक पथक पुण्यात ठाण मांडून होते. तिला गुरुवारी (दि. ९) दुपारी कंपनीच्या परिसरातून ताब्यात घेण्यात आले. सायंकाळी नोटीस देऊन सोडल्यानंतर शुक्रवारी (दि. १०) पुन्हा अटक करण्यात आली. त्यामुळे कंपनीतील इतर अधिकारी -कर्मचारीही आता अडचणीत सापडले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गंभीर दखल घेतली आहे. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके, देवळाली कॅम्पचे पोलिस निरीक्षक श्रीनिवास देशमुख, मुंबई नाक्याचे पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांसह बारा जणांचे विशेष तपास पथक (एसआयटी) याबाबत तपास करीत आहे.
    Maharashtra TimesPune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलीवर काकाचा अत्याचार, मोबाईल शूटिंग करणारी तक्रारदार मावशीच फिरली, पण पाच पुराव्यांमुळे 25 वर्ष तुरुंगवास

    एचआर संशयित, अधिकारी रडारवर

    संबंधित गुन्ह्यातील सर्व पीडिता पदवीधर व उच्चपदवीधर असून, १८ ते २२ हजार रुपयांपर्यंत त्यांना वेतन आहे. त्यांपैकी काही पीडितांनी कंपनी व्यवस्थापनाने पीडितांच्या लेखी व तोंडी तक्रारींकडे दुर्लक्ष केले होते. हे दुर्लक्ष केल्यामुळे संशयितांचे धारिष्ट्य वाढले आणि हा प्रकार पुढे सुरू राहिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार एका गुन्ह्यात ‘एचआर’ संशयित असून, तिच्यामुळे व्यवस्थापनातील इतरही अधिकारी रडारवर आले आहेत. गंभीर बाब म्हणजे, संबंधित कंपनीची देशभरात कार्यालये असून, ‘मोठ्या पॅकेज’साठीही कंपनी चर्चेत आहे. मात्र, तेथील तरुणींना होणाऱ्या त्रासाची दखल का घेतली नाही, या मुद्द्यावरून आता व्यवस्थापकीय अधिकारी कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा