Nashik traffic Change Update: महात्मा जोतिबा फुले जयंतीनिमित्त आज शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहे. कोणते रस्ते बंद? पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या
पर्यायी मार्ग असे…
–द्वारकाकडून येणारी वाहने : सरळ मुंबई नाका सर्कल-इंदिरानगर बोगदा-आर. डी. सर्कल-सिटी सेंटर मॉल सिग्नलमार्गे पुढे जातील
–इंदिरानगर बोगद्याकडून येणारी वाहतूक : मुंबई नाका सर्कल येथील महात्मा फुले पुतळ्याच्या पाठीमागून सरळ वडाळा नाका दिशेने मार्गस्थ होईल
– ‘सीबीएस’कडून येणारी वाहतूक: गडकरी चौक सिग्नल-चांडक सर्कल-सिबल फर्निचरमार्गे मार्गस्थ होईल
–मेनरोडकडे जाणारी वाहतूक : नेपाळी कॉर्नर शालिमार सीबीएसमार्गे जाता येईल
–गाडगे महाराज पुलाकडे जाणारी वाहतूक : सप्तशृंगी देवी मंदिर-अमरधाम रोडमार्गे मार्गस्थ
Nashik ZP: दप्तर दिरंगाई झाल्यास थेट कारवाई; नाशिक जिल्हा परिषदेचे CEO ओमकार पवार यांचा इशारा
मिरवणूक मार्ग असा (वाहतुकीस बंद)
मुंबई नाका सर्कल-मदिना चौक-नॅशनल हायस्कूल-सारडा सर्कल-फाळकेरोड-हाजी टी पॉइंट-महात्मा फुले मार्केट-दूध बाजार चौक-बादशाही कॉर्नर-गाडगे महाराज पुतळा-मेनरोड-धुमाळ पॉइंट-दहीपूल (प्रकाश सुपारी शॉप) नेहरू चौक-दिल्ली दरवाजा- गाडगे महाराज पूल-आयुर्वेदिक हॉस्पिटल-पालिका शाळा क्रमांक ३० येथील महात्मा फुले पुतळा येथे मिरवणुकीचा समारोप होईल.
Nashik Crime : सिंगल असल्याचं भासवून फ्लर्ट, WhatsApp ग्रुपवर प्लॅन, आठ तरुणींशी जवळीक, नाशिकच्या MNC मध्ये धर्मांतराचं जाळं
संसरी नाक्यावर कोंडी
नाशिकरोड : देवळाली कॅम्प येथील लामरोडसह अनेक गावांना जोडणारा प्रमुख रस्ता असलेल्या संसरी नाक्यावर रिक्षाचालकांच्या बेशिस्तीमुळे वाहतूक कोंडी होत आहे. येथे रिक्षाचालक नो-पार्किंग झोनमध्ये वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. येथून जाणाऱ्या वाहनांसाठी समस्या निर्माण होते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी या रिक्षाचालकांवर कठोर कारवाई न केल्यास नागरिक, तसेच विविध राजकीय पक्षांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
