Crime News : सायबर गुन्हेगारांनी सिम-स्वॅपिंग/क्लोनिंगद्वारे ही लबाडी केली होती. यामध्ये मूळ ग्राहकाचा सिम हा ‘नो नेटवर्क’मध्ये टाकला जातो आणि त्यानंतर स्वतःला ग्राहक असल्याचे भासवून बेकायदा व्यवहार केले जातात.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांच्या बँक खात्यांचा गैरवापर करून त्यांचे पैसे लाटण्याचे प्रकार वाढीस लागले असताना मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात महत्त्वाचा आदेश दिला आहे. पुण्यात व्यावसायिक असलेल्या बँक खातेदाराची कोणतीही चूक नसताना बँक खात्यातील त्याचे तब्बल ३८ लाख चार हजार रुपये सायबर गुन्हेगारांनी अन्य खात्यांत वळवून त्याला लुबाडल्याची गंभीर दखल घेत, ते पैसे व्यावसायिकाला देण्याचा आदेश न्यायालयाने एचडीएफसी बँकेला दिला आहे.
सहा टक्के व्याजाने परत करा
‘खातेदाराची कोणतीही चूक नसताना त्याला त्याच्या स्वत:च्या पैशांपासून पाच वर्षांहून अधिक काळपासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे आठ आठवड्यांत ही रक्कम वार्षिक सहा टक्के व्याजासह परत करावेत. अन्यथा, त्या रकमेवर आठ टक्के व्याजदर लागू होईल’, असे न्या. भारती डांगरे व न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले आहे.
सिम क्लोनिंगचा व्यावसायिकाला फटका
१५ जुलै २०२१ रोजी सायबर गुन्हेगारांनी सिम-स्वॅपिंग/क्लोनिंगद्वारे ही लबाडी केली होती. ज्यामध्ये मूळ ग्राहकाचा सिम हा ‘नो नेटवर्क’मध्ये टाकला जातो आणि त्यानंतर स्वतःला ग्राहक असल्याचे भासवून बेकायदा व्यवहार केले जातात. सायबर गुन्हेगारांनी पुण्यातील व्यावसायिक सुबोध कोरडे यांच्या खात्यांमध्ये तीन अज्ञात खातेदारांची नावे लाभार्थी म्हणून समाविष्ट केली. शिवाय पैसे काढण्याची चार लाखांची मर्यादा ४० लाखापर्यंत वाढवली आणि त्यानंतर पैसे त्या लाभार्थी खात्यांमध्ये वळवले. मुंबईहून एअर इंडिया विमान उडालं, काही मिनिटातच वैमानिक ‘पॅन पॅन’ ओरडला, प्रवासी भिजलेले, फ्लाईट परतलं; PAN PAN Call म्हणजे काय?
४१ मिनिटांत आठ व्यवहार
‘या दोन्ही व्यवहारांच्या बाबतीत बँकेकडून मला मोबाइलवर किंवा ई-मेलवर कोणताही ओटीपी आधी आला नाही. तसेच एचडीएफसी बँकेच्या तांत्रिक सुरक्षाव्यवस्थेत या व्यवहारांविषयी ‘डिक्लाइन ॲड पेयी’ आणि ‘ट्रान्झॅक्शन आयपी डज नॉट मॅच…’ असे ॲलर्ट असतानाही बँकेकडून त्या व्यवहारांना कृत्रिम पद्धतीने मान्यता देण्यात आली. त्यामुळे सायबर गुन्हेगारांनी ४१ मिनिटांत पैसे वळवण्याच्या केलेल्या आठ व्यवहारांत खात्यातून आपली इतकी मोठी रक्कम वळवली’, असे व्यावसायिकाने ज्येष्ठ वकील शरण जगतियानी व ॲड. अक्षय पानसरे यांच्यामार्फत न्यायालयाच्या निदर्शनास आणले.
‘याचिकाकर्त्याने कोणतीही निष्काळजी केलेली नाही किंवा पासवर्ड कोणाशीही शेअर केलेला नाही. निष्काळजी असती तर ते सिद्ध करण्याची जबाबदारी बँकेवर होती. जे बँकेला करता आलेले नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ६ जुलै २०१७ रोजीच्या परिपत्रकानुसार, ग्राहकाचा अशा फसवणुकीत कोणताही सहभाग नसल्यास आणि त्याने त्वरित तक्रार केली असल्यास त्याला शून्य जबाबदारीचा लाभ मिळतो. या प्रकरणात बँकेने एसएमएस ॲलर्ट पाठवले असल्याचा दावा केला असला, तरी त्यासाठी कोणतेही ठोस पुरावे दिलेले नाहीत. Crime News : नवरा शरीरसंबंध ठेवत नाही, सारखा बाथरुममध्ये असतो, बायकोचा आरोप, मेडिकल फाईल तपासताच पायाखालची जमीन सरकली
आयपी लोकेशन चेन्नईत
शिवाय, बँकेच्या तपास अहवालानुसार संशयास्पद व्यवहारांचे आयपी लोकेशन चेन्नई येथे असल्याचे दिसून आले, जे ग्राहकाच्या नियमित व्यवहारांपेक्षा पूर्णतः वेगळे होते. त्यामुळे व्यवहार याचिकाकर्त्याने केले नाहीत, हे स्पष्ट होते. शिवाय संबंधित खाते काळ्या यादीत असल्याचे दर्शविले गेल्याने व्यवहाराच्या वेळी ग्राहकाशी संपर्क साधता येत नव्हता, याची बँकेलाही जाणीव होती. त्यामुळेच एचडीएफसी बँकेने स्वतःच गेलेले पैसे परत मिळवण्यासाठी आयसीआयसीआय बँकेकडे प्रयत्न केल्याचे दिसते,’ असे खंडपीठाने नमूद केले.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा