Nanded Accident News : नांदेडमध्ये अपघाताची भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. टाटा मॅजिक आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने ही अपघाताची घटना घडली आहे.
नांदेड अपघात वाघमारे दाम्पत्य मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अर्जुन राठोड, नांदेड : अत्यंत काबाडकष्ट करून मुलांना घडवलं; एका मुलाला वकील बनवलं, तर एकुलत्या एक मुलीला अधिकारी म्हणून पाहण्याचं आई-वडिलांचं स्वप्न होतं. मात्र, त्यांच्या या स्वप्नावर नियतीने पाणी फिरवलं. नांदेडमध्ये भोकरजवळील सीताखंडी घाटात काल गुरुवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात पांडुरंग वाघमारे आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई वाघमारे यांचा करुण अंत झाला. या दुर्दैवी अपघातात वाघमारे दाम्पत्यासह एकूण आठ जणांचा मृत्यू झाला असून, एका क्षणात वाघमारे कुटुंबाचं हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त झालं आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आयुष्यभर गवंडीकाम काम करुन संसाराचा गाडा हाकला
पांडुरंग वाघमारे हे भोकर शहरातील सईदनगर येथील रहिवासी होते. त्यांच्या परिवारात दोन मुले, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. पांडुरंग वाघमारे यांनी आयुष्यभर गवंडीकाम (मिस्तरीकाम) करून संसाराचा गाडा हाकला आणि मुलांचं शिक्षण पूर्ण केलं. आई-वडिलांच्या कष्टाचं चीज करत त्यांचा एक मुलगा वकील झाला, तर दुसरा मुलगा वडिलांच्या व्यवसायात हातभार लावतो. मुलगी सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. मुलांच्या यशानंतर मुलीला उच्च पदावर (अधिकारी) बघण्याचं या दाम्पत्याचं स्वप्न होतं, परंतु नियतीचा खेळ अत्यंत क्रूर ठरला.
Pune Crime : ऑनलाइन गेमिंग अन् बेटिंगच्या विळख्यात अडकून आयुष्य संपवलं, पुण्यातील MPSC करणाऱ्या प्रथमेश देशमुख प्रकरणात नवीन माहिती
मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचलं
काल गुरुवारी पांडुरंग वाघमारे यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना उपचारासाठी नांदेडला आणण्यात आलं होतं. रुग्णालयात दाखवून दोघेही ‘टाटा मॅजिक’ वाहनाने भोकर येथील आपल्या घराकडे परतत होते. भोकर शहरालगत असलेल्या सीताखंडी घाटाजवळ ‘टाटा मॅजिक’ आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यात वाघमारे दाम्पत्यासह आठ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. जखमींवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धक्कादायक म्हणजे, मृतांमध्ये दोन वेगवेगळ्या कुटुंबांतील दोन सख्ख्या भावांचाही समावेश आहे. ज्या आई-वडिलांनी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचलं, तेच आज मुलांना पोरके करून निघून गेल्यानं संपूर्ण भोकर परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून जखमींची विचारपूस
नांदेड – भोकर महामार्गावरील वाकद गावाजवळील सीताखंडी घाटात भरधाव ट्रक आणि टाटा मॅजिक वाहनाच्या धडकेत झालेल्या अपघाताची माहिती मिळताच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भोकर येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी दुर्घटनेतील जखमींची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली, तसेच मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं. जखमींवर तातडीने आवश्यक ते सर्व उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाला दिल्या. उपचारात कोणतीही हयगय होणार नाही याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले. या दुर्दैवी दुर्घटनेबद्दल त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा