• Tue. Jun 16th, 2026
    Nashik BJP Protest : नाशिकमधील IT कंपनीत बळजबरी धर्मांतर अन् अत्याचार प्रकरण, कंपनीविरोधात भाजप आक्रमक; कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन

    Nashik BJP Protest : नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत महिलांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा दबाव टाकल्याप्रकरणी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पोलिसांनी याप्रकरणी SIT स्थापन केली असून भाजपच्या ठिय्या आंदोलनामुळे वातावरण तापले आहे.

    नाशिकमधील IT कंपनीत बळजबरी धर्मांतर अन् अत्याचार प्रकरण, कंपनीविरोधात भाजप आक्रमक; कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जयेश साबळे, नाशिक : शहरातील एका नामांकित आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, शारीरीक शोषण आणि धर्मांतरासाठी दबाव टाकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचे पडसाद शहरात उमटले असून, आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने संबंधित कंपनीच्या प्रवेशद्वारावर जोरदार ठिय्या आंदोलन करण्यात आले. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून नाशिक पोलिसांनी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे.

    नेमका प्रकरण काय?

    संबंधित कंपनीत काम करणाऱ्या काही पीडित महिलांनी गंभीर आरोप केले आहेत. एका विशिष्ट धर्माच्या सहा जणांकडून गेल्या काही महिन्यांपासून महिलांचा विनयभंग आणि अत्याचार केला जात असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर, महिलांच्या धार्मिक भावना दुखावून त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणला जात असल्याचेही पीडितांनी म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांत रीतसर तक्रार दाखल करण्यात आली असून 6 संशयितांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

    भाजप आक्रमक

    या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते कंपनीवर धडकले. सुरुवातीला कंपनी व्यवस्थापनाने निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्याने वातावरण अधिकच तापले. संतापलेल्या कार्यकर्त्यांनी थेट कंपनीच्या आवारात प्रवेश करत प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला.

    Maharashtra TimesLt Col Shrikant Purohit : मालेगाव स्फोटातून निर्दोष सुटका अन् आता लष्कराकडून सन्मान; लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित यांना ब्रिगेडियर पदी बढती

    यावेळी भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, गटनेते शाम बडोदे, सरचिटणीस सुनील देसाई यांच्यासह रश्मी हिरे, सोनाली कुलकर्णी आणि अन्य महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत कंपनी प्रशासनाचा निषेध केला. अखेर व्यवस्थापनाने निवेदन स्वीकारल्यानंतर हे आंदोलन शांत झाले.

    SIT कडून तपास सुरू

    पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या प्रकरणाची दखल घेत तातडीने SIT स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. महिला अत्याचार आणि धर्मांतराच्या दबावासारखे गंभीर आरोप असल्याने पोलीस तांत्रिक आणि प्रत्यक्ष पुराव्यांची सखोल तपासणी करत आहेत. या नामांकित कंपनीत घडलेल्या या प्रकारामुळे आयटी क्षेत्रात खळबळ उडाली असून, आगामी काळात तपासातून नेमके काय सत्य बाहेर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा