मालेगाव स्फोट प्रकरणातून निर्दोष सुटका झाल्यानंतर लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांना भारतीय लष्कराने ब्रिगेडियर पदावर बढती दिली आहे. १७ वर्षांचा प्रदीर्घ लढा आणि सशस्त्र सेना न्यायाधिकरणाच्या हस्तक्षेपानंतर पुरोहित यांना हा न्याय मिळाला आहे.
मालेगाव स्फोटातून निर्दोष सुटका अन् आता लष्कराकडून सन्मान; लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित यांना ब्रिगेडियर पदी बढती(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून गेल्या वर्षी निर्दोष मुक्तता झालेले भारतीय लष्करातील अधिकारी लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांना आता ब्रिगेडियर पदावर पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. लष्कराने त्यांना या वरिष्ठ पदासाठी पात्र ठरवले असून, संबंधित प्रशासकीय प्रक्रियेनंतर त्यांच्या पदोन्नतीवर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सुमारे 17 वर्षांच्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर लष्कराने हा निर्णय घेतला आहे. याबद्दलची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
नेमके काय होते सर्व प्रकरण?
29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमधील भिक्खू चौक भागात झालेल्या एका स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता, तर 95 जण जखमी झाले होते. या प्रकरणाच्या तपासादरम्यान महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) कर्नल पुरोहित यांना अटक केली होती. दहशतवादाशी संबंधित आरोपांखाली अटक झालेले ते पहिलेच कार्यरत लष्करी अधिकारी होते. 2011 मध्ये हा तपास एनआयएकडे (NIA) सोपवण्यात आला. अखेर जुलै 2025 मध्ये विशेष एनआयए न्यायालयाने पुराव्याअभावी कर्नल पुरोहित, प्रज्ञासिंह ठाकूर आणि इतर पाच जणांची सर्व आरोपांतून मुक्तता केली.
न्यायाधिकरणाचा हस्तक्षेप
कर्नल पुरोहित 31 मार्च 2026 रोजी लष्करी सेवेतून निवृत्त होणार होते. मात्र, प्रदीर्घ न्यायालयीन खटल्यामुळे आपली पदोन्नती आणि सेवाविषयक लाभ रोखले गेल्याचे नमूद करत त्यांनी सशस्त्र सेना न्यायाधिकरणाकडे धाव घेतली होती.
Ladki Bahin Yojana : ‘पैसे नसतील तर योजना थांबवा’; लाडकी बहीण योजनेवरुन उच्च न्यायालयानं सरकारला सुनावलं
या याचिकेवर सुनावणी करताना न्यायाधिकरणाने त्यांच्या निवृत्तीला स्थगिती दिली आणि संरक्षण मंत्रालयाला त्यांच्या पदोन्नतीबाबत तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश दिले. या कायदेशीर प्रक्रियेनंतर आता त्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
तुरुंगवास आणि लष्करी कारकीर्द
कर्नल पुरोहित यांनी या खटल्यादरम्यान जवळपास नऊ वर्षे न्यायालयीन कोठडीत घालवली होती. 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. अटकेच्या वेळी ते लष्करी गुप्तचर विभागात कार्यरत होते. मात्रा निर्दोष सुटकेनंतर आता लष्कराने त्यांना पदोन्नतीसाठी पात्र ठरवल्याने त्यांच्या सेवा ज्येष्ठतेचा आणि लष्करी नियमावलीनुसार मिळणाऱ्या लाभांचा प्रश्न मार्गी लागला आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा