छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी एका कुख्यात गुंडाचा गेम ओव्हर केला आहे. हा गुंड शहरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न करायचा. पोलिसांनी त्याला तडीपाराची नोटीस देखील बजावली होती. पण तरीही त्याचे कृत्य सुरुच होते. अखेर पोलिसांनी त्याला खाकीचा हिसका दाखवला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : शहर आणि परिसरात आपल्या गुन्हेगारीची दहशत पसरवणाऱ्या सराईत गुंडांविरुद्ध छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी आता सर्जिकल स्ट्राईक सुरू केला आहे. मुकुंदवाडी आणि एमआयडीसी सिडको परिसरात घातक शस्त्रांच्या बळावर धिंगाणा घालणाऱ्या कुख्यात गुंड धीरज केदारे याच्या मुसक्या आवळत पोलिसांनी त्याला थेट कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात गजाआड केले आहे. पोलीस आयुक्तांनी त्याच्याविरुद्ध ‘एमपीडीए’ कायद्यान्वये कठोर कारवाई केल्याने शहरातील टवाळखोर अन् गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
धीरज केदारेवर गंभीर गुन्हे
धीरज रवींद्र केदारे (वय २६, रा. संजयनगर, गल्ली क्र. १२, मुकुंदवाडी) हा गेल्या काही काळापासून मुकुंदवाडी आणि आसपासच्या हद्दीत नागरिकांसाठी मोठा उपद्रव ठरला होता. त्याच्यावर मुकुंदवाडी आणि एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात दरोडा टाकणे, प्राणघातक हल्ला करणे, घातक शस्त्रांनी गंभीर दुखापत पोहोचवणे, जबरी चोरी, महिलांचा विनयभंग करणे, घरावर बेकायदेशीर हल्ला करणे आणि सार्वजनिक शांतता भंग करणे असे अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत.
Dighi Shipbuilding Cluster : देशात सर्वात मोठं शिपयार्ड दिघी पोर्टवर उभारणार, 27 हजार कोटींची गुंतवणूक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
तडीपाराची नोटीस देवूनही आरोपीचा हैदोस
गुन्हेगारी प्रवृत्ती सोडून सनदशीर मार्गाने जगण्यासाठी पोलिसांनी त्याला यापूर्वी फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार नोटीस बजावली होती. तसेच शहरातून हद्दपार (तडीपार) देखील केले होते. मात्र, कायद्याचा कोणताही धाक न बाळगता धीरजने हद्दपारीचा आदेश धुडकावून लावत पुन्हा शहरात येऊन गुन्हेगारी कारवाया सुरूच ठेवल्या होत्या.
Shiv Sena Hearing : शिंदेंच्या वकिलांकडून पक्षांतर्गत लोकशाहीचा मुद्दा, शिवसेनेच्या सुनावणीत अभूतपूर्व ट्विस्ट, वाचा A टू Z युक्तिवादत्याची ही वाढती गुन्हेगारी आणि नागरिकांमधील भीती लक्षात घेऊन पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी 14 सप्टेंबर रोजी त्याच्याविरुद्ध ‘एमपीडीए’ (महाराष्ट्र धोकादायक उपक्रमांना प्रतिबंधक कायदा) अन्वये स्थानबद्धतेचे आदेश जारी केले.
या पोलीस पथकाने बजावली धडक कामगिरी
पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या आणि मुकुंदवाडी पोलिसांच्या विशेष पथकाने धीरज केदारे याला ताब्यात घेऊन त्याची रवानगी कोल्हापूर येथील मध्यवर्ती कारागृहात केली. ही कारवाई सपोनि रोहित गांगुर्डे, पोउपनि अजय शितोळे, सफौ सुखदेव जाधव, अंमलदार समाधान काळे, दिपाली सोनवणे आणि महादेव दाणे यांच्या पथकाने फत्ते केली.
शहरात विविध भागात पोलिसांचा रुट मार्च
दरम्यान, गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आरएएफ सोबत एसआरपीएफ, आरसीपी, क्यूआरटी व परिमंडळातील पोलिस अधिकारी, अंमलदार यांचे १५ सप्टेंबर, १६ सप्टेंबर व १८ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या दरम्यान शहरात विविध भागात रुट मार्चचे नियोजन करण्यात आले आहे. शहरात विविध भागात विविध वेळेत रुट मार्च केले जाणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे.
Heavy Rain Forecast : कमी दाबाचा पट्टा, नंतर चक्रीवादळ, सप्टेंबरच्या शेवटच्या दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार, पंजाबराव डख यांचा अंदाज
१६ सप्टेंबर रोजी दुपारी ४.५० वाजेपासून हर्सुल गाव, जटवाडा रोड, जहांगिर कॉलनी, यासीननगर तसेच दुपारी ५.५५ वाजताच्या दरम्यान बेरीबाग, मयुरपार्क, हर्सुल टी तसेच ६.३५ वाजताच्या दरम्यान जाधववाडी, चेतनानगर
१८ सप्टेंबर रोजी सकाळी ९.५० वाजेपासून चंपाचौक ते आझाद चौक, सेंट्रल नाका, बायजीपुरा, कटकट गेट, सकाळी ११ पासून कैलासनगर चौक, सकाळी ११.५० पासून नवाबपूरा, जिन्सी चौक, मदनी चौक तसेच क्रांतीचौक भागात दुपारी ४.५० वाजता पैठण गेट, सब्जीमंडी, खोकडपुरा, जाफरगेट, तसेच दुपारी ५.५५ सिल्लेखाना चौक, दिवाणदेवडी, सायंकाळी ६.३५ वाजताच्या दरम्यान गांधीनगर, बापुनगर, टिळकपथ
१९ सप्टेंबर रोजी बेगमपुरा हद्दीत सकाळी ९.५० वाजता बेगमपुरा चौक, ढिंबरगल्ली, जयसिंगपुरा, पहाडसिंगपुरा, सकाळी ११ वाजता एन १३, हडको कॉर्नर, सारा वैभव, जटवाडा रोड, तसेच सकाळी ११.५० वाजता हिमायत बाग, होनाजीनगर तसेच पुंडलिकनगर हद्दीत दुपारी ४.५० ला भवानी चौक, ५.५५ वाजता पाण्याची टाकी, पुंडलिकनगर चौक, सायंकाळी ६.३५ छत्रपती शिवाजी महाराज चौक.
२० सप्टेंबर रोजी सकाळी ९.५० वाजता चिकलठाणा, हिनानगर, चौधरी कॉलनी, कामगार कॉलनी, सकाळी ११ वाजता नारेगाव चौक, अजीज कॉलनी, म्हाडा कॉलनी, मसनतपूर, सकाळी ११.५० वाजता एन १ सिडको, पटेलनगर, पाॅवर लूम तसेच मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुपारी ४.५० वाजता विठ्ठलनगर चौक, अंबिकानगर, संजयनगर तसेच दुपारी ५.५५ वाजता रामनगर चौक, जयभवानीनगर, सायंकाळी ६.३५ वाजता एन २, सिडको, मुकुंदवाडी
२१ सप्टेंबर रोजी सकाळी ९.५० वाजता शिवाजीनगर, त्रिमुर्ती चौक, टिळकनगर, उल्कानगरी, बालाजीनगर, विष्णूनगर, सकाळी ११ वाजता शिवशंकर कॉलनी, भानुदासनगर, राजनगर, नाथनगर तसेच सकाळी ११.५० वाजता सुतगिरणी चौक, गादीया विहार, काबरानगर, शंभुनगर
२२ सप्टेंबरला सकाळी ९.५० कोकणवाडी चौक, क्रांतीनगर, पद्मपुरा, सकाळी ११वाजता देवगिरी कॉलेज समोरील रोड, गाडेचौक, सकाळी ११.५० वाजता रेल्वे स्टेशन चौक, जहागिरदार कॉलनी, राहुलनगर तसेच सिडको पोलिस ठाण्यातंर्गत दुपारी ४.५० वाजता बळीराम पाटील चौक, संभाजी कॉलनी, सायं. ५.५५ वाजता एन ११, एन १२ शॉपींग कॉम्प्लेक्स, सायंकाळी ६.३५ वाजता चिश्तिया कॉलनी, मिसारवाडी, सिद्धार्थनगर, आंबेडकरनगर
२३ सप्टेंबर एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत सकाळी ९.५० वाजता पंढरपूर चौक, बजाजनगर, रांजणगाव शेणपुंजी, ११ वाजता वडगाव कोल्हाटी व परिसर, साजापूर, कमलापूर, जोगेश्वरवाडी, सकाळी ११.५० वाजता वाळूज हद्दीत वाळूज गाव, धनगर गल्ली, साठेनगर, भारतनगर, हिदायतनगर तसेच सिटीचौक पोलिस हद्दीत ४.५० वाजता संस्थान गणपती, गांधीपुतळा, सिटीचौक, गुलमंडी तसेच सायंकाळी ५.५५ धावणी मोहल्ला, जुना मोंढा रोड, सायंकाळी ६.३५ चेलीपुरा चौक, लोटा कारंजा, बुढ्ढीलेन, भडकल गेट परिसर
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा