Chhatrapati Sambhajinagar Crime: सवईवाला यांनी पोलिसांत जाण्याची भूमिका घेताच, झिंझुवडिगा यांच्यातील एकाच्या पत्नीने फोन करून ‘तुम्ही माझ्या पतीचे अपहरण केले असून मी तुमच्यावर अपहरणाची केस करीत आहे, अशी धमकी दिली.
या प्रकरणात आतिष सुभाष सवईवाला (रा. गांधी निवास, कासारी बाजार) यांनी तक्रार दिली. त्यांचा कासारी बाजार येथे सोन्या चांदीचे दागिने विक्रीचा व्यवसाय आहे. सवईवाला आणि राजकोट येथील जयदीप झिंझुवडिगासह अन्य दोघांशी दहा वर्षांपासून व्यावसायिक संबंध आहेत. २६ जानेवारी २०२६ रोजी हे तीनही व्यापारी शहरात आले. आम्ही तीन टक्क्यांऐवजी १.५ टक्के मजुरीवर शुद्ध सोन्यापासून दागिने बनवून देऊ, असे आमिष सवईवाला यांना दाखवले. जुने संबंध असल्याने त्यांनी तिघांवर विश्वास ठेवला.
Crime News : पहिल्या नवऱ्याने जीव दिला, पूजा गावंडेने पुन्हा लग्न केलं, दुसऱ्या नवऱ्याने जीव घेतला, दीड महिन्यापूर्वी काय घडलं?
सोन्याचे दागिने तयार करण्यासाठी दोन किलो सोने, चांदी परत दिले नाही. तसेच खोट्या केसमध्ये अडकाविण्याची धमकी देत, जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या झिंझुवडिगा (सर्व रा. राजकोट, गुजरात) यांच्याविरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक श्रीनिवास रायलवार हे करीत आहेत.
महाराष्ट्रात जाऊ न देण्याची धमकी
राजकोटच्या पोलिस ठाण्यात गेल्यानंतर तिथे झिंझुवडिगा आणि त्यांच्यासोबत असलेल्या १०-१५ जणांनी सवईवाला यांना ठार मारण्याची धमकी दिली. अपहरणाचा गुन्हा दाखल होईल या भीतीने तक्रारदार छत्रपती संभाजीनगरला परतले. त्यानंतरही फोनवर ‘सोने मागायला राजकोटला आल्यास जिवंत महाराष्ट्रात जाणार नाही, अशी धमकी आरोपींनी दिली.
Crime News : जेवणात केस सापडला, नवऱ्याकडून मारहाण, 25 वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं, सासरच्या सात जणांवर गुन्हा
दोन किलोहून अधिक शुद्ध सोने दिले
सवईवाला यांनी त्यांच्या ताब्यातील १६९५ ग्रॅम सोनेवीट, २२६.११० ग्रॅम चांदी आणि ९६.९०० ग्रॅम तांबे असे एकूण २०१८.८९० ग्रॅम सोने, चांदी आणि तांबे मिश्रण दागिने बनवण्यासाठी झिंझुवडिगा यांच्याकडे दिले. २० ते २५ दिवसांनंतरही दागिने मिळाले नाहीत, तसेच झिंझुवडिगा यांचे फोन बंद येऊ लागल्याने सवईवाला यांना संशय आला. २४ फेब्रुवारी रोजी ते मित्र मछिंद्र नलावडे यांच्यासोबत राजकोटला गेले. तिथे गेल्यावर ‘आमचे कामगार सर्व सोने चोरून घेऊन गेले’, अशी उडवाउडवीची उत्तरे आरोपींनी दिली.
