• Tue. Sep 15th, 2026

Sangli News : आटपाडी प्रकरणी वृद्ध नराधमास फाशीची शिक्षा, अन्य दोन गुन्ह्यात मरेपर्यंत जन्मठेप

सांगलीच्या आटपाडीतील चिमुकलीवरील अत्याचार-खून प्रकरणी वृद्ध नराधमास फाशीची शिक्षा सुनावली आहे. तसेच अन्य दोन अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपीची शिक्षा सुनावली आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सांगली : आटपाडी तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या नराधमास दोषी धरून न्यालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. शिवाजी कोंडीबा काळेल असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. तसेच अन्य दोन अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात त्याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश रविकरण भागवत यांच्या न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील आरती आनंद देशपांडे-साठविलकर यांनी बाजू मांडली.

नेमकं प्रकरण काय?

७ जानेवारी २०१८ रोजी दुपारी चारच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाली होती. नातेवाइकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला; मात्र ती सापडली नाही. दुसऱ्या दिवशी, ८ जानेवारी रोजी गळवेवाडी येथील जगमाईच्या विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला. वैद्यकीय तपासणी व शवविच्छेदन अहवालातून तिच्यावर अत्याचार करून गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले.

आरोपी दोन गुन्ह्यांनंतर पोलिसांना सापडला

सुरुवातीचे सुमारे सहा महिने आरोपी पोलिसांच्या हाती लागला नव्हता. दरम्यान, २६ जुलै २०१८ रोजी दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात शिवाजी काळेल याच्याविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल झाला.

पीडितेच्या मुलींच्या आईंचे जबाब

तपासादरम्यान पीडित मुली आणि त्यांच्या आईंचे न्यायालयात जबाब नोंदविण्यात आले. या जबाबातून ७ जानेवारी २०१८ रोजीच्या घटनेच्या दिवशी आरोपी आणि मृत मुलगी एकत्र असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पुढे नेत काळेल याला चिमुकलीच्या हत्या प्रकरणातही मुख्य आरोपी केले.

Maharashtra TimesNagpur News : नागपुरात चार तास अभूतपूर्व नाट्य, तरुण टॉवरवर चढला, मनधरणीसाठी प्रशासन एकवटलं

आरोपाचा प्रकरणाचा छडा लावणाऱ्या पैसे बक्षीस देण्याचा बनाव

तपासात आरोपीने अत्याचारानंतर मुलीची हत्या करून मृतदेह घरातील लोखंडी कणगीत लपवून ठेवल्याचे समोर आले. त्यानंतर नातेवाइकांसोबत मुलीचा शोध घेण्याचे नाटक करून त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तसेच प्रकरणाचा छडा लावणाऱ्यास आपण स्वतः ५० हजार रुपये बक्षीस देऊ, असेही तो सांगत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर रात्री दोन ते अडीचच्या सुमारास चादरीत गुंडाळलेला मृतदेह घराजवळील जगमाईच्या विहिरीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासातून स्पष्ट झाले.

पोलिसांनी आरोपीला कसं पकडलं?

पोलिसांनी तपासादरम्यान लोखंडी कणगी आणि चादर जप्त केली. चादरीवर पीडित मुलीची टिकली आढळून आली. तिच्या आजी-आजोबांनी ही टिकली ओळखली. तसेच कोल्हापूर येथील न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेतील अहवालात कणगीत मानवी रक्त आणि शरीरातील द्रव आढळल्याचे स्पष्ट झाले.

Maharashtra TimesHeavy Rain Forecast : कमी दाबाचा पट्टा, नंतर चक्रीवादळ, सप्टेंबरच्या शेवटच्या दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार, पंजाबराव डख यांचा अंदाज

19 साक्षीदार तपासले

हे पुरावे न्यायालयीन सुनावणीत महत्त्वाचे ठरले. या खटल्यात सरकार पक्षाने एकूण 19 साक्षीदार तपासले. न्यायालयाने युक्तिवाद आणि सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य धरत चिमुकलीवरील अत्याचार आणि खून प्रकरणात शिवाजी काळेल याला फाशीची शिक्षा, तर अन्य दोन अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा