उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विडंबनात्मक गीत गायल्या प्रकरणी कॉमेडियन कुणाल कामरा याच्या विरोधात विधान परिषदेत हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. कुणाल कामरा याने आपल्या स्टँडअप कॉमेडीच्या शोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गीत गायलं होतं. त्याने 23 मार्च 2025 रोजी आपल्या शोमध्ये संबंधित गीत गायलं होतं. हे गीत सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं होतं. या गाण्यावरुन संतापलेल्या शिवसैनिकांनी मुंबईच्या खार येथील हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड केली होती. या प्रकरणी विधान भवनात दाखल झालेल्या हक्कभंग प्रस्तावावर आज सुनावणी होत आहे. कुणाल कामरा आज विधान भवन परिसरात दाखल झाला तेव्हा त्याच्या टी-शर्टवर लिहिलेला मजकूर हा चर्चेला कारण ठरत आहे. “बुरा नही हूँ. बस , आपको अच्छा नहीं लगता”, असं वाक्य कुणाल कामराच्या टीशर्टवर लिहिलं होतं. हक्कभंग समिती अध्यक्ष प्रसाद लाड यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली. सुनावणीनंतर प्रसाद लाड यांनी या संदर्भात माहिती दिली. ते काय म्हणाले पाहा…