प्रसाद रानडे, रत्नागिरी: राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या माध्यमातून सरकारने दिलासा दिलेला असतानाच आता आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना परदेशवारी करण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. राज्यातील संबंधित जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडून यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलं आहे. असंच आवाहन रत्नागिरी जिल्हा कृषी विभागाकडून विभागाकडूनही करण्यात आल आहे. यासाठी काही निकष निश्चित करण्यात आले असून निवड झालेल्या शेतकऱ्यांना या अभ्यासदौऱ्यासाठी अर्ज करता येणार आहे.
शेतीमध्ये केवळ उत्पादन वाढवण्यावर समाधान न मानता, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमालाचा दर्जा सुधारण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे २०२६-२७ या वर्षासाठी ‘शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे’ या राज्य पुरस्कृत योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना युरोप व चीन देशांच्या दौऱ्यावर जाण्याची संधी मिळणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केलं आहे.
अनुदानाचे स्वरूप आणि जिल्ह्याचे उद्दिष्ट या योजनेअंतर्गत निवड झालेल्या शेतकऱ्यांना परदेश दौऱ्यासाठी येणाऱ्या एकूण खर्चाच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त २ लाख रुपये (यापैकी जी रक्कम कमी असेल ती) शासनाकडून अनुदान म्हणून देण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी एकूण ५ शेतकऱ्यांचा लक्षांक (कोटा) निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये खालीलप्रमाणे आरक्षण असणार आहे. -१ महिला शेतकरी
- १ केंद्र/राज्य स्तरावरील कृषी पुरस्कार प्राप्त किंवा पीक स्पर्धा विजेते शेतकरी
– ३ इतर शेतकरी (लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास, जिल्हास्तरावर सोडत (लॉटरी) काढून लाभार्थ्यांची निवड केली जाईल.)निवडीसाठी प्रमुख अटी व निकषया योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाने काही महत्त्वपूर्ण अटी निश्चित केल्या आहेत.वय आणि व्यवसाय- शेतकऱ्याचे वय सहलीला निघण्याच्या दिवशी किमान २५ वर्षे पूर्ण असावे. शेतकऱ्याचे उत्पन्नाचे मुख्य साधन शेतीच असावे. तो कोणत्याही शासकीय, निमशासकीय, खासगी संस्थेत नोकरीस नसावा (तसेच डॉक्टर, वकील, सीए, अभियंता नसावा). पासपोर्ट अनिवार्य आहे. अर्ज करताना शेतकऱ्याकडे किमान एक वर्ष वैध मुदत असलेला पासपोर्ट असणे बंधनकारक आहे. कुटुंबातील एकालाच संधी मिळणार आहे. शेतकरी कुटुंबातून (पती, पत्नी व १८ वर्षांखालील मुले) केवळ एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. स्वखर्चानेही इतर सदस्याला सोबत नेण्यास परवानगी नाही.
फार्मर आयडी शेतकऱ्याचे ‘अॕग्रीस्टॅक’ (AgriStack) अंतर्गत फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. यापूर्वी कोणत्याही शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अर्थसहाय्याने परदेश दौरा केलेला नसावा. शेतकरी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक असून, तसे एम.बी.बी.एस. (MBBS) डॉक्टरांचे प्रमाणपत्र व कोरोना तपासणी अहवाल (निवड झाल्यानंतर) देणे बंधनकारक आहे. अर्जासोबत जोडायची आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत –
चालू कालावधीचा (गेल्या ६ महिन्यांतील) ७/१२ व ८ अ उतारा, आधार कार्ड आणि रेशन कार्डची झेरॉक्स प्रत, वैध पासपोर्टची झेरॉक्स प्रत, डॉक्टरांकडून मिळालेले तंदुरुस्ती प्रमाणपत्र शेतकऱ्यांनी या दौऱ्यासाठी अर्ज संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जमा करायचे आहेत. ज्या शेतकऱ्यांना या परदेश दौऱ्यात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह १७ ऑगस्ट २०२६ पूर्वी आपल्या संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जमा करावेत. जिल्ह्यातील शेतकरी पुरुष व शेतकरी महिला शेतकरी यांना या उपक्रमाचा लाभ घेता येणार आहे. सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन रत्नागिरी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केलं आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा